🌟महाराष्ट्रातील सर्वच महत्वाचे राजकीय पक्ष फोडणाऱ्या भारतीय जनता पार्टीची लोकसभा निवडणुकीत झोप उडवणारा वाघ...!


🌟एकट्या उद्धव ठाकरेंना हरवायला एवढी खटाटोप ? खरोखर मानल त्या वाघाला🌟 


✍🏻लेखक - देवा पाटील (संघर्ष योध्दा)

महाराष्ट्र राज्यात लोकसभा निवडणूक नुकतीच पार पडली या निवडणूक काळात संपूर्ण महाराष्ट्राला एक प्रश्न पडला देशासह राज्यात सरकारी तपास यंत्रणा अर्थात सिबीआय/ईडी सारख्या यंत्रणांचा पुरेपूर वापर करीत 'तोडा फोडा आणि राज्य करा' या इंग्रजांच्या नितीचा वापर करीत सत्ताधारी भारतीय जनता पार्टीने अनेक राजकीय पक्षांमध्ये फुट पाडून महाराष्ट्रासह अनेक राज्यांत सत्तेची सुत्र हाती घेतली परंतु लोकसभा निवडणूकीत भाजप नेत्यांनी सर्वात जास्त धसकी जर कोणाची घेतली असेल तर ती शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे या एकट्या वाघाची असेच म्हणावे लागेल.


महाराष्ट्र राज्यात लोकसभा निवडणूक काळात पंतप्रधान पदासारख्या देशाच्या सर्वोच्च पदावर विराजमान असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पराभव डोळ्यासमोर दिसल्यामुळे तब्बल सतरा सभांसह रोड शो देखील करावा लागला याची इतिहासात नोंद होईल याचे एकमेव कारण म्हणजे महाराष्ट्रातील एकमेव अस्सल वाघ उद्धव ठाकरे.... शिवसेना पक्षात फुट पाडून फुटीर गटाच्या शिवसेनेसह तोडा फोडा नियतीचा अवलंब करीत फोडलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसला तसेच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला सोबत घेऊन देखील फक्त एकट्या उद्धव ठाकरेंना हरवायला रस्त्यावर उतरलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदींना सर्वात मोठी धडकी जर कोणी बसवली असेल तर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे या निथड्या छातीच्या वाघाने....खरच मानलं या वाघाला भाजप नेत्यांची झोप उडवणारा बलाढ्य नेता पहिल्यांदा पहिलाय संपूर्ण महाराष्ट्रासह देशाने शिवसेना पक्षप्रमुख मा.श्री उध्दव बाळासाहेब ठाकरे तुम्हाला त्रिवार मानाचा जय महाराष्ट्र......

 संघर्ष योद्धा - देवा पाटील परभणी 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या