🌟परभणी शहरात उद्या मंगळवार दि.१४ मे रोजी छत्रपती संभाजी महाराज जयंती निमित्त भव्य शोभायात्रा.....!


🌟संभाजी सेनेच्या वतीने छत्रपती संभाजी महाराज जयंती महोत्सवाचे आयोजन🌟 

परभणी (दि.१३ मे २०२४) : परभणी जिल्हा संभाजी सेनेच्या वतीने उद्या मंगळवार दि.१४ मे २०२४ रोजी छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंती महोत्सवा निमित्ताने परभणी शहरात भव्य शोभायात्रा काढण्यात येणार आहे मध्यवस्तीतील खंडोबा बाजार येथून या शोभायात्रेस प्रारंभ होणार असून त्याचे उद्घाटन आमदार डॉ.राहुल पाटील यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून मराठा आरक्षण समन्वय समिती अध्यक्ष सुभाष जावळे,प्रा.के.पी.कणके, डॉ.राजू सुरवसे, शासकीय कंत्राटदार आर.बी.घोडके, डॉ.विवेक नावंदर, डॉ.केदार खटीग, मुरलीधर खुपसे यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती राहणार आहे.

              खंडोबा बाजारमार्गे शनिवार बाजार, छत्रपती शिवाजी महाराज चौक, गांधी पार्क मार्गे नारायण चाळ मार्गे छत्रपती शिवाजी महाराज पुतळा याठिकाणी या शोभायात्रेचा समारोप होणार आहे. या मिरवणुकीत छत्रपती संभाजी महाराज यांची भव्य प्रतिमा रथामध्ये ठेवण्यात येणार आहे. तसेच ढोलताशा पथक, घोडेस्वार मावळे, प्रसिद्ध लेझिम पटपथक, पालखी, वारकरी, हलगी पथक, गोंधळी पथक,वासुदेव पथक, बँड पथक मिरवणुकीचे आकर्षण राहणार आहे. फटाक्यांंच्या आतिषबाजीसह भव्य मिरवणूक निघणार आहे.

             या मिरवणुकीत मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन संभाजीसेना प्रदेशाध्यक्ष रामेश्‍वर शिंदे, जिल्हाध्यक्ष विठ्ठल तळेकर, ग्रामीण जिल्हाध्यक्ष सुधाकर सोळंके, जिल्हा उपाध्यक्ष अप्पाराव वावरे, मराठवाडा उपाध्यक्ष गजानन लव्हाळे, शहराध्यक्ष अरुण पवार, जिल्हा संपर्क प्रमुख नारायण देशमुख, तालुकाध्यक्ष दौलत शिंदे, विद्यार्थी शहराध्यक्ष सोनू पवार, युवक तालुकाध्यक्ष राजू शिंदे, उमेश शिंदे, पवन कुरील, युवा सेना शहर प्रमुख बाळराजे तळेकर, गणेश बोरीकर, निलेश भुसारे, सतीश नाईक, प्रमोद जोगदंड, प्रसाद पवार, रोहित घनघाव, पप्पू रणवीर, पवन शिंदे, अभी कदम, कैलास इकर, दत्ता काकडे, गजानन शिंदे, शाहरुख चाऊस, झहीर शेख, विशाल तळेकर, विकी जोगदंड, आकाश दुधाटे, मुंजा पोळ, आकाश शिंदे, गोविंद घोडके, कुशाल जोगदंड,अर्शद काजी, प्रल्हाद पवार, जयेश घोगरे, प्रदीप बुचाले, अजय मोरे, अजय भिसे, भागवत कदम, गोरख तावडे, शिवा आव्हाड आदींनी केले आहे.......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या