🌟पुर्णा जंक्शन रेल्वे डिझेल डेपोतील डिझेल चोरी प्रकरणी वरिष्ठ रेल्वे अधिकारी संशयाच्या भोवऱ्यात ?


🌟डिझेल चोरी प्रकरणातील आरोपींवर निलंबनाच्या कारवाई ऐवजी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून आरोपीतांना पदोन्नतीचे बक्षीस ?🌟


नांदेड/पुर्णा (विशेष वृत्त - चौधरी दिनेश) :- दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागांतर्गत येणाऱ्या पुर्णा जंक्शन रेल्वे स्थानकावरील रेल्वे डिझेल डेपोतील डिझेल चोरी प्रकरणाच्या तपासासह रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या संशयास्पद भुमिकेवर देखील आता प्रश्न चिन्ह निर्माण झाले असून मागील पाच महिन्यांपूर्वी २९ डिसेंबर २०२३ रोजी उघडकीस आलेल्या रेल्वे डिझेल प्रकरणाचा दक्षिण मध्य रेल्वे नांदेड विभागातील वरिष्ठ अधिकारी निष्पक्षपातीपणे सखोल तपास करुन मागील अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या डिझेल घोटाळ्यातील घोटाळेबाजांवर कठोर कारवाईचा बडगा उगारतील अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती परंतु दुर्दैवाची बाब म्हणजे या प्रकरणातील आरोपींवर कठोर कारवाई करण्याऐवजी संबंधित अधिकारी प्रकरणातील आरोपींवर निलंबनाची कारवाई करण्याऐवजी त्यांना पदोन्नतीची बक्षीस बहाल करीत त्यांची सन्मानपूर्वक इतरत्र बदली करुन प्रकरणावर पडदा टाकण्याचा गंभीर प्रकार करतांना दिसून येत आहे.

दरम्यान डिझेल चोरी प्रकरणाच्या घटनेच्या काही दिवसांनंतर स्टोअर रूम जळाल्याच्या संशयास्पद घटनेनंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पुर्णा जंक्शन येथील मुख्य कर्मीदल अधिक्षक चेपुरी सुरेश यांची चौकशी लावून सिसीसी पदावरुन हटविले व ०४ मार्च २०२४ रोजी मुख्य कर्मीदल अधिक्षक म्हणून अन्य अधिकाऱ्याची नियुक्ती केली परंतु संबंधित अधिकारी प्रकृती अस्वस्थतेमुळे मेडीकल रजेवर गेल्यानंतर व डिझेल चोरी प्रकरणासह स्टोअररुम जळीत प्रकरण काही प्रमाणात दबल्यानंतर नवीन नियुक्त सिसीसी यांना कुठल्याही प्रकारची पुर्वसुचना न देता आरोपीत पुर्व सिसीसी चेपुरी सुरेश यांच्याकडे पुन्हा सिसीसी (मुख्य कर्मीदल अधिक्षक) पदाचा पदभार कसा व कोणाच्या आदेशानुसार दिला ? असा प्रश्न उपस्थित होत आहे 

याहीपेक्षा गंभीर बाब म्हणजे पुर्णा रेल्वे स्थानक क्रमांक एकच्या नुतनीकरणासाठी जुन्या इमारतीसह यावरील कार्यालयांची तोडफोड केली जात असून याठिकाणी पर्सनल क्लार्कच्या ऑफिसमध्ये मागील दहा वर्षांपासूनचे सिटीआर दस्तावेज (पुरवठा) ठेवण्यात आलेले असून ज्यात रेल्वे डिझेल डेपोतील आवक/जावकर संदर्भातील संपूर्ण माहिती असते स्टोअर रूम जाळपोळ प्रकरणा प्रमाणेच प्रकरण घडवून सदरील सिटीआर नष्ट करण्यासाठी तर आरोपीत सिसीसी चेपुरी सुरेश यांची नियुक्ती तर केली नसावी ना ? असा शंकात्मक प्रश्न देखील आता उपस्थित होत असून चौकशीच्या घेऱ्यात अडकलेल्या आरोपीत सिसीसी चेपुरी सुरेश यांना पुन्हा पदबहालीचा आदेश कोणी व कोणत्या नियमानुसार दिला असावा? हा एक फार मोठा प्रश्न उपस्थित होत असून पुर्णा रेल्वे डिझेल डेपोतील डिझेल महाघोटाळ्यसह स्टोअररुम जळीत प्रकरणाचा सखोल तपास लावण्याच्या दृष्टीने संबंधित प्रकरणांचा तपास सिबीआयकडे देवून यातील रेकॉर्डवरील आरोपींसह मागील दहा वर्षांपासून रेल्वे डिझेल डेपोत कार्यरत अधिकारी/कर्मचाऱ्यांच्या संपत्तीच्या चौकशीसाठी ईडीकडे देखील तपास देण्यात यावा अशी मागणी होत आहे 

दरम्यान पुर्णा जंक्शन येथील रेल्वे कंज्युमर डिपोतील डिझेल चोरी प्रकरणातील रेल्वे सुरक्षा बलाच्या रेकॉर्डवरील मुख्य आरोपी आरसीडी मुख्य अधिक्षक माधव बलफेवाड,आरसीडी सहाय्यक अधिक्षक मोहम्मद इस्लाऊद्दीन उर्फ मोबीन,डि.कृष्णा आरसीडी चिफ लोको इन्स्पेक्टर, कांचन कुमार चिफ इन्चार्ज,चौकशीच्या कचाट्यात अडकलेले वरिष्ठ सहाय्यक डिव्हीजनल मेकॅनिकल इंजिनिअर विनोद साठे नांदेड यांच्यावर दक्षिण मध्य रेल्वे नांदेड विभागीय प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी कमालीचे मेहेरबान असल्याचे निदर्शनास येत असून संबंधित आरोपीतांवर निलंबनाची कारवाई करण्याऐवजी त्यांना पदोन्नती बहाल करीत त्यांची सन्मानपूर्वक इतरत्र बदली करुन पुर्णा जंक्शन रेल्वे स्थानकावरील रेल्वे डिझेल डेपोतील डिझेल चोरी' प्रकरणावर पडदा तर टाकण्याचा गंभीर प्रकार तर करीत नाहीत ना ? असा प्रश्न उपस्थित होत असून या प्रकरणातील मुख्य आरोपी माधव बलफेवाड यांची मुख्य अधिक्षक सिएनडब्लू जालना तर मोहम्मद इस्लाऊद्दीन उर्फ मोबीन यांची मुख्य अधिक्षक सिएनडब्लू नांदेड तर डि.कृष्णा यांची चिफ लोको इन्स्पेक्टर अकोला तर कांचन कुमार यांची मुख्य इन्चार्ज (कॅरेज अॅंड वॅगन) सिएनडब्लू पुर्णा आदींच्या सन्मानपूर्वक पदोन्नती देऊन बदल्या करण्यात आल्याने दक्षिण मध्य रेल्वे नांदेड विभागातील अधिकारी देखील संशयाच्या भोवऱ्यात अडकल्याचे निदर्शनास येत असल्याने या डिझेल महाघोटाळ्याचा तपास सिबीआय/ईडीकडे देण्याची मागणी होत आहे.

दरम्यान पुर्णा रेल्वे डिझेल डेपोतील डिझेल घोटाळ्यातील घोटाळेबाज वरिष्ठ अधिकाऱ्यांचे खंबीर पाठबळ मिळत असल्याने कमालीचे मुजोर झाल्याचे दिसत असून हमारा बाल भी बाका नहीं हो सकता असे म्हणत प्रसार माध्यमांना धमकीवजा बोलतांना दिसत आहेत......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या