🌟जंग-ए-अजित न्युज - महत्वाच्या अपडेट / हेडलाईन्स / बातम्या......!


🌟छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सर्व मोठ्या बांधकामांना स्थगिती जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश : भीषण पाणीटंचा🌟

✍️ मोहन चौकेकर

* पुणे हिट अँण्ड रनप्रकरणातील अल्पवयीन मुलाचा जामीन रद्द, ५ जूनपर्यंत बालसुधारगृहात रवानगी, सज्ञान असल्याचा निर्णय पोलीस तपासानंतर ठरवणार, बाल न्याय मंडळाचा निकाल

* पुणे रॅश ड्रायव्हिंग प्रकरणात अल्पवयीन मुलाचे वडील विशाल अगरवालची पोलीस कोठडीत रवानगी, विशाल अगरवालसह तिघांना २४ मेपर्यंत पोलीस कोठडी 

* पुणे कार अपघातातील अगरवाल कुटुंबीयांचं अंडरवर्ल्ड कनेक्शन, शिवसेना पदाधिकारी अजय भोसलेंच्या हत्येच्या सुपारीसाठी छोटा राजनची मदत घेतल्याचा आरोप

* कल्याणीनगर अपघातानंतर पुणे महापालिका अलर्ट मोडवर, कोरेगाव परिसरातील आणखी ३ अवैध पबवर बुलडोझर

* उजनी जलाशयात बुडालेली बोट ३५ फूट खोल पाण्यात सापडली, बेपत्ता सहा प्रवासी दगावल्याची भीती, तर आजचं शोधकार्य थांबवलं

* गजानन कीर्तिकरांच्या भूमिकेनंतर शिवसेनेत नाराजी, कीर्तिकरांवर पक्षांतर्गत कारवाईची शक्यता,शिवसेनेच्या शिस्तभंग कमिटीकडे तक्रार अर्ज दाखल

* मुंबईतील मतदानाच्या दिवशीची उद्धव ठाकरेंची पत्रकार परिषद निवडणूक आयोग तपासणार, मतदान सुरू असताना आयोगावर आरोप केल्याची आशिष शेलारांची तक्रार.

* मुंबईतील मविआच्या नेत्यांनी घेतली निवडणूक अधिकाऱ्यांची भेट, केंद्रीय निवडणूक आयोगाकडे सूचना पाठवणार, अधिकाऱ्यांचं मविआ नेत्यांना आश्वासन

* राज्य निवडणूक आयोगाकडून अधिकृत मतदान टक्केवारी जाहीर, राज्यात ४८ जागांवर ६१.०५% मतदान, २०१९ च्या तुलनेत फक्त ०.०९ टक्के मतदान कमी 

* छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सर्व मोठ्या बांधकामांना स्थगिती, जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश,भीषण पाणीटंचाईमुळे निर्णय.

* अभिनेता शाहरुख खान अहमदाबादमधील रुग्णालयात दाखल, उन्हाच्या त्रासामुळे तब्येत बिघडली, आयपीएलचा सामना पाहण्यासाठी शाहरुख अहमदाबादमध्ये आला होता 

* कोकण, कोयनासह अनेक ठिकाणी मुसळधार पावसाची हजेरी, शेतकऱ्यांचं लाखोंचं नुकसान

* राज्यातील तापमानात सातत्यानं वाढ; संपूर्ण  विदर्भासह संपूर्ण मराठवाडासह नंदुरबार, धुळे जळगांव, नाशिक,अहमदनगर या जिल्ह्यात कमाल तापमान सरासरीपेक्षा 4 ते 6 डिग्री से. ने अधिक वाढणार

* होर्डिंग्स संदर्भात पिंपरी-चिंचवड महापालिका अॅक्शन मोडवर ; 20 फलकांवर निष्कासनाची कारवाई, 24 जाहिरात धारकांवर गुन्हे दाखल

* अहमदनगरला EVM ठेवलेल्या स्ट्राँगरुममध्ये घुसखोरीचा प्रयत्न, उमेदवार निलेश लंके यांनी निवडणूक आयोगाकडे तक्रार करण्याचा घेतला निर्णय 

* चांदीचा गाठला नवा विक्रम! चांदीने 95 हजारांचा टप्पा केला पूर्ण, लवकरच चांदी होणार 1 लाख रुपये?   

* राज्यातील कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत; कांद्याच्या दरात मोठ्या प्रमाणात घसरण; शेतकरी संतप्त 

* लालपरीच्या नव्या ऑनलाईन तिकीट आरक्षण प्रणालीला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद; एसटी महामंडळाने दिली माहिती  

✍️ मोहन चौकेकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या