🌟नांदेड गुरुद्वारा बोर्डासह सिख समाज धावला धारुर तालुक्यातील गोपाळपूर येथील अपघातग्रस्त सिकलकरी समाजाच्या मदतीला...!


🌟गुरुद्वारा बोर्डाचे अध्यक्ष डॉ.विजय सतबीरसिंघ यांच्यासह सिख सिकलकरी समाज बांधवांनी मुक्तहस्ते केली आर्थिक मदत🌟


 
नांदेड (दि.१८ मे २०२४) :- बिड जिल्ह्यातील धारुर तालुक्यातल्या गोपाळपूर येथे दि.११ मे २०२४ रोजी झालेल्या भयंकर वादळामुळे भारत संचार निगम लिमिटेड बिएसएनएलचे टॉवर कोसळून सिकलीगर कुटुंबातील ०८ वर्षाच्या मुलीचा जागीच मृत्यू झाला तर या दुर्दैवी घटनेत जवळपास तीन ते चार मुले गंभीर जखमी झाली एवढ्या मोठ्या या अपघातामुळे गरीब सिख सिकलकरी समाजाची आठ ते दहा घरे उद्ध्वस्त झाली त्यामुळे अनेक कुटुंबांना आपली संसार उघड्यावर मांडावी लागली अश्या या गंभीर परिस्थितीत या कुटुंबांच्या मदतीला कुणीही धावून आले नाही मात्र या परिस्थितीत अपघातग्रस्त कुटुंबांना खऱ्या अर्थाने आधार व मदतीची आवश्यकता असल्याची जाणीव हुजूर साहीब नांदेड सचखंड गुरुद्वारा बोर्ड प्रशासनाचे अध्यक्ष सरदार विजय सतबीरसिंघ यांच्यासह हुजूरी सिख समाजाला झाल्यानें संपूर्ण सिख समाज व गुरुद्वारा बोर्ड प्रशासना ही त्यांच्या मदतीला धावून गेले सचखंड गुरुद्वारा बोर्डाचे अध्यक्ष सन्माननीय सरदार डॉ.सतबीर सिंघ यांनी अपघातग्रस्तांना रेशनसाठी आर्थिक मदत केली सदरील मदत घेऊन हुजुरी सिख समाज बांधव आणि गुरुद्वारा बोर्डाचे कर्मचारी सर्व मिळून धारूर तालुक्यातील गोपाळपूरला रवाना झाले.


या कार्यासाठी गुरुद्वारा बोर्डाच्या वतीने अध्यक्ष डॉ.सरदार विजय सतबीर सिंग यांनी सर्व प्रकारची मदत व मार्गदर्शन केले, त्याचप्रमाणे गुरुद्वारा सचखंड बोर्डाचे अधिक्षक सरदार राज देवेंद्र सिंग,गुरुद्वाराचे सहायक अधिक्षक हरजीतसिंग कडेवाले गुरुद्वाराचे सहायक अधिक्षक सरदार रवींद्र सिंग कपूर यांनी मार्गदर्शन केले. स.बसंत सिंघजी रागी,स.रविंदरसिंघजी मोदी,स.मनबीरसिंघजी ग्रंथी,स.तेगासिंगजी बावरी,स.तेजपालसिंगजी खेड,स.वीरेंद्रसिंगजी बेदी,स.बलजीतसिंघ बावरी,स.अजयसिंघ,स.मनप्रीतसिंघ कारागीर.स.बक्षीसिंघ पुजारी आदींनी पीडित कुटुंबाला मदत करण्यासाठी परिश्रम घेतले.....




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या