🌟राज्यातील विधान परिषदेतील चार मतदार संघाच्या निवडणुका जाहीर....!


🌟विधान परिषदेसाठी 10 जूनला मतदान तर 13 जूनला मतमोजणी🌟

राज्यात सध्या लोकसभा निवडणुकीतील पहिला तीन टप्प्यातील मतदान पूर्ण झाले आहे. तर आणखी दोन टप्पे मतदान होणार आहे. या पार्श्वभूमीवर आता राज्य विधान परिषदेच्या चार जागांसाठी देखील निवडणूक जाहीर झाली आहे. मुंबई, नाशिक आणि कोकण विभागात ही निवडणूक होणार आहे. यामध्ये मुंबई आणि कोकण पदवीधर मतदारसंघाचा तर मुंबई आणि नाशिक शिक्षक मतदार संघाचा समावेश आहे. या चारही मतदारसंघातील आमदारांचा कार्यकाळ 7 जुलै रोजी संपणार आहे.

विधान परिषदेतील पदवीधर आणि शिक्षक मतदार संघासाठी 10 जून रोजी मतदान होणार आहे. यामध्ये चार जागांचा समावेश आहे. विधान परिषदेमध्ये असलेल्या एकूण सदस्यांपैकी 7 सदस्य हे शिक्षक मतदार संघातील तर 7 सदस्य हे पदवीधर मतदारसंघातून निवडून येतात. यातील दोन पदवीधर मतदारसंघातील आणि दोन शिक्षक मतदार संघातील आमदारांचा कार्यकाल 7 जुलै रोजी संपत आहे. त्यामुळे या चार जागांसाठी निवडणूक आयोगाने निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. या जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार दहा जून रोजी राज्यात मतदान होणार असून 13 जून रोजी मतमोजणी प्रक्रिया पार पडणार आहे.

*खालील चार आमदारांचा कार्यकाळ 7 जुलैला संपणार*

1. मुंबई पदवीधर मतदारसंघ विलास विनायक पोतनीस (ठाकरे गट)

2. कोकण पदवीधर मतदारसंघ निरंजन बसंत डावखरे (भाजप)

3. नाशिक शिक्षक मतदारसंघ किशोर भिकाजी दराडे (ठाकरे गट)

4. मुंबई शिक्षक मतदारसंघ कपिल हरिश्चंद्र पाटील (लोकभारती)

*असे असतील निवडणुकीचे टप्पे:*

• 15 मे- निवडणूक प्रक्रियेला सुरुवात

• 22 में अर्ज दाखल करण्याचा अंतिम दिनांक

• 24 में दाखल झालेल्या अर्जाची छाननी

• 27 में अर्ज मागे घेण्यासाठी अंतिम दिनांक

• 10 जून प्रत्यक्ष मतदान

• 13 जून मतमोजणी

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या