🌟नांदेड दक्षिण मध्य रेल्वे प्रशासने 'नांदेड-हडपसर-नांदेड' विशेष गाडीच्या १२ फेर्‍या केल्या मंजूर.....!


🌟उन्हाळी सुट्यात होणारी प्रवाशांची गर्दी लक्षात घेवून दक्षिण मध्य रेल्वे प्रशासनाने घेतला महत्वपूर्ण निर्णय🌟 

 नांदेड (दि.१८ मे २०२४) : नांदेड दक्षिण मध्य रेल्वे प्रशासने उन्हाळी सुट्यात प्रवाशांची होणारी गर्दी लक्षात घेवून नांदेड-हडपसर-नांदेड' विशेष गाडीच्या १२ फेर्‍या केल्या मंजूर केल्या असून दक्षिण मध्य रेल्वे प्रशासनाने प्रवाशांच्या हितासाठी घेतलेला हा निर्णय निश्चितच अभिनंदनीय आहे.

       नांदेड-हडपसर साप्ताहिक विशेष गाडीच्या ०६ फेर्‍या होणार आहेत गाडी क्रमांक ०७६२३ हुजूर साहिब नांदेड ते हडपसर विशेष गाडी दिनांक २२,२९ मे आणि ०५,१२,१९ आणि २६ जून २०२४ ला दर बुधवारी नांदेड रेल्वे स्थानकावरून रात्री ०९ वाजता सुटेल आणि पूर्णा,परभणी,मानवत, सेलू, परतूर, जालना, औरंगाबाद, लासुर, रोटेगाव,अंकाई,मनमाड, कोपरगाव,अहमदनगर,दौंड कॉर्ड लाईन मार्गे हडपसर येथे दुसर्‍या दिवशी सकाळी ११.२० वाजता पोहोचेल ही गाडी मे आणि जून महिन्यात मिळून ०६ फेर्‍या पूर्ण करेल.

त्याचबरोबर हडपसर - नांदेड  साप्ताहिक विशेष गाडीच्या ०६ फेर्‍या होणार असून गाडी क्रमांक ०७६२४ हुजूर साहिब नांदेड ते हडपसर विशेष गाडी दिनांक २३,३० मे आणि ०६,१३,२० आणि २७ जून २०२४ ला दर गुरुवारी हडपसर रेल्वे स्थानकावरून दुपारी ०३.१५ वाजता सुटेल आणि दौंड कॉर्ड लाईन, अहमदनगर, मनमाड, अंकाई, रोटेगाव, लासुर, औरंगाबाद, जालना, परतूर, सेलू, मानवत, परभणी, पूर्णा मार्गे हुजूर साहिब नांदेड  येथे दुसर्‍या दिवशी सकाळी ०४.३० वाजता पोहोचेल. ही गाडी मे आणि जून महिन्यात मिळून ०६ फेर्‍या पूर्ण करेल. या गाडीत वातानुकूलित आणि स्लीपर मिळून २२ डब्बे असतील, अशी माहिती दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड येथील जनसंपर्क विभागाने दिली......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या