🌟परभणी जिल्हाधिकारी कार्यालयात दहशतवाद व हिंसाचार विरोधी दिनानिमित्त घेण्यात आली शपथ...!


🌟जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालयात घेण्यात आली शपथ🌟


परभणी (दि.२१ मे २०२४) : माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्यावरील दहशतवादी हल्ल्याचा विरोध म्हणून ‘दहशतवाद व हिंसाचार विरोधी दिवस’ पाळण्यात येतो.या दहशतवाद व हिंसाचार विरोधी दिनानिमित्त जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालयात शपथ घेण्यात आली.

यावेळी अपर जिल्हाधिकारी डॉ. प्रताप काळे, निवासी उपजिल्हाधिकारी श्रीमती अनुराधा ढालकरी, उप जिल्हा निवडणूक अधिकारी जनार्धन विधाते, तहसीलदार डॉ. संदीप राजपुरे, नायब तहसीलदार प्रशांत वाकोडकर यांच्यासह अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.....

******

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या