🌟परभणी जिल्ह्यातल्या पुर्णा तालुक्यातील धानोरा काळे येथे ऊस पिकावर ड्रोनद्वारे फवारणी प्रात्यक्षिक....!


🌟वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ व वाव गो ग्रीन हरियाणा यांच्या संयुक्त विद्यमाने ड्रोनद्वारे फवारणी प्रात्यक्षिक🌟


परभणी/पुर्णा : शेतीच्या विविध कामांमध्ये फवारणी अत्यंत महत्त्वाचे काम असून त्याकरिता पारंपारिक पद्धतीचा वापर केल्याने शेतकऱ्यांना बऱ्याच अडचणींना सामोरे जावे लागत आहे. वेळेवर मजूर मिळत नाही, पिकास रोग लागल्यावर वेळच्या आत फवारणी होत नाही, मुजरावर व औषधीवर अवाढव्य खर्च करूनही पिकाच्या परिस्थितीनुसार बऱ्याच वेळेस सापाची भीती, फळबाग व इतर पिकांची उंची इत्यादी कारणास्तव प्रभावीपणे वेळेवर फवारणी करणे शक्य होत नाही त्यामुळे खर्च करूनही शेतीचे गणित बिघडतात व उत्पादनात घट येते. शेतकऱ्यांच्या अडचणी पाहता राष्ट्रीय पातळीवर ड्रोन करीता सल्ला देणारे मा. कुलगुरू डॉ.इंद्रमणी वनामकृवि, परभणी यांनी शेतकऱ्यांकरिता डॉ. शंकर गोयंका यांची गो ग्रीन कृषी विमान, हरियाणा या कंपनीशी शेतकऱ्यांना भाडेतत्वावर ड्रोन द्वारे फवारणी करता यावी याकरिता सामंजस्य करार केला.

 त्या अनुषंगाने आज धानोरा काळे येथील उद्यान पंडित शेतकरी  प्रताप काळे यांच्या ऊस पिकावर तसेच शिवारातील पाच एकर वर फवारणी करून देण्यात आली. या प्रात्यक्षिका करिता परिसरातील मोठ्या संख्येने शेतकऱ्यांनी हजेरी दर्शवली विद्यापीठाच्या वतीने डॉ. स्मिता सोलंकी यांनी उपस्थित शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले यावेळी शेती अभ्यासक हेमचंद्र शिंदे, कृषीअधिकारी पूर्णा, प्रवीण काळे, अनिल हरकळ,तसेच वाव गो ग्रीन कंपनीचे श्री कोल्हे, राहुल मगदूम व ड्रोन पायलट आर्यवीर ठाकूर यांनी शेतकऱ्यांना ड्रोन प्रात्यक्षिक करून दाखवले तसेच शेतकऱ्यांशी चर्चा करून त्यांचे शंका समाधान केले. शेतकऱ्यांसमोर पाच एकर वरील ऊस पिकावर फवारणी झाल्यावर उपस्थित शेतकऱ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला व विद्यापीठांनी शेतकऱ्यांकरिता तंत्रज्ञान त्यांच्या बांधावर आणून अवगत केल्याने विद्यापीठाचे आभार मानले व उपस्थित शेतकऱ्यांनी या तंत्रज्ञानामुळे शेतकऱ्यांचा वेळ पैसे व होणारे काबाडकष्ट हे कमी होऊन तरुण शेतकऱ्यांना नक्कीच या नवीन तंत्रज्ञानाद्वारे रोजगार उपलब्ध होईल अशी भावना उपस्थित संभाजीराव भोसले,वसंतराव ढवळे, बालासाहेब हिंगे,रामकिशनराव काळे,भगवानराव काळे,सुरेश दूधाटे,पंढरीनाथ शिंदे,अनिकेत काळे,जनक काळे,बालाजी काळे,शेतकऱ्यांनी व्यक्त केली द्रोण प्रात्यक्षिक कार्यक्रमाचे आयोजन कृषी योद्धा शेतकरी उत्पादक कंपनी ली, ताडकळस यांचे वतीने करण्यात आले होते......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या