🌟पुर्णा तालुक्यात शेतकरी आत्महत्यांचे सत्र थांबता थांबेना : अठरा दिवसात दोन शेतकऱ्यांनी कर्जाला कंटाळून केली आत्महत्या...!


🌟तालुक्यातील गोविंदपूर येथील तरुण शेतकर्‍याने वडिलांवरील कर्जाच्या विवंचनेपोटी रेल्वेसमोर उडी मारुन केली आत्महत्या🌟 

पुर्णा (दि.०७ मे २०२४) - पुर्णा तालुक्यात शेतकरी आत्महत्यांचे सत्र थांबता थांबत नसून मागील महिन्यात दि.१८ एप्रिल २०२४ रोजी तालुक्यातील मौ.कान्हेगाव येथील येथील ३२ वर्षीय तरुण शेतकरी अमोल बोकारे यांनी कर्जबाजारीपणाला कंटाळून धावत्या रेल्वे समोर उडी घेऊन आत्महत्या केल्याच्या घटनेला अठरा दिवसांचा कालावधी उलटत नाही तोच तालुक्यातील गोविंदपूर येथील ३८ वर्षीय तरुण शेतकरी राजू शिवाजीराव चौधरी यांनी वडिलांवरील कर्जाच्या विवंचनेपोटी रेल्वेसमोर उडी मारुन आत्महत्या केल्याची हृदयविदारक घटना घडल्याचा प्रकार आज मंगळवार दि.०७ मे २०२४ रोजी सकाळी उघडकीस आला.        

या घटने संदर्भात सविस्तर वृत्त असे की गोविंदपूर येथील तरुण शेतकरी राजू शिवाजीराव चौधरी यांचे वडील शिवाजीराव चौधरी यांनी काही वर्षांपूर्वी एका राष्ट्रीयकृत बँकेमार्फत घेतले होते परंतु सततच्या नापिकीसह कधी अल्पवृष्टी तर कधी अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीमुळे कर्जाची परतफेड होत नाही या विवंचनेत त्यांनी रेल्वेसमोर उडी मारुन आत्महत्या केली आज मंगळवार दि.०७ मे रोजी सकाळी तो प्रकार निदर्शनास आला. दरम्यान, चुडावा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेवून तपास सुरु केला. या दुर्देवी घटनेने गोविंदपुर या गावासह पंचक्रोषित शोककळा पसरली आहे.

दरम्यान पुर्णा तालुक्यात शेतकरी आत्महत्यांच्या सत्राला सुरुवात झाल्याचे निदर्शनास येत असून प्रशासनाने शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे.....


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या