🌟जंग-ए-अजित न्युज महत्वाच्या अपडेट / हेडलाईन्स / बातम्या......!


🌟इंडिया’ आघाडी देशाला मागे नेईल ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आरोप,कल्याणकारी योजनांना खीळ बसण्याची चिंता🌟

✍️मोहन चौकेकर

* मुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी मराठवाड्यातील पाणीटंचाईचा घेतला आढावा;तहानलेल्या मराठवाड्यासाठी टँकरद्वारे पाणीपुरवठा करणार जनावरांसाठी चाऱ्याची सोय करणार असल्याची  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मोठी घोषणा 

* आमिर खानच्या संस्थेच्या मदतीने शिवार पाणीदार करण्याची घोषणा ; पाणीच उपलब्ध नाही ट्रॅक्टर मध्ये पाणी कुठुन आणणार, अजित पवारांसारखे आणणार का ? विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना  उपरोधिक टोला व सवाल ( काही वर्षांपूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी धरणात मुतु का असे वक्तव्य केले केले होते त्या विधानाच्या पार्श्वभूमीवर विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केले वक्तव्य )

* इंडिया’ आघाडी देशाला मागे नेईल; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आरोप, कल्याणकारी योजनांना खीळ बसण्याची चिंता

* डोंबिवली MIDC स्फोट; 7 जणांचा मृत्यू, 30 लोक गंभीर जखमी

* आज शेअर बाजारात मोठ्या घडामोडी घडल्या; निफ्टी पहिल्यांदाच 22800 च्या पुढे, सेन्सेक्सही 770 अंकांनी वधारला!

* प्रवरा नदीपात्रात एसडीआरएफ पथकाची बोट उलटली; या घटनेत एसडीआरएफ पथकाच्या तीन जणांचा मृत्यू झाला 

* आमदार पी. एन.पाटील अनंतात विलीन; हजारोंच्या साक्षीने शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

* एसटीच्या नव्या आरक्षण प्रणालीला चांगला प्रतिसाद, आरक्षण करून प्रवास करणाऱ्यांचे प्रमाण 3 लाखांनी वाढले!

* जलसंपदा आणि महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांवर कारवाई करा, मृतांच्या नातेवाईकांना 5 लाखांची मदत द्या, उजनी दुर्घटनेबाबत मुख्यमंत्र्यांकडे मागणी 

* सोलापूर जिल्हा परिषदेतून एकाच दिवशी होणार 250 कर्मचारी निवृत्त होणार 

* डोंबिवलीतील एमआयडीसीमधील स्फोटाने परिसर हादरला, अनेक इमारतींच्या काचा फुटल्या, तर परिसरात धुराचे लोळ

* डोंबिवली MIDCमधील घातक केमिकल कंपन्यांचं अंबरनाथ एमआयडीसीत स्थलांतर करणार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची यांची घोषणा 

* रॅश ड्रायव्हिंग प्रकरणी विशाल अगरवाल आणि सुरेंद्रकुमार अगरवाल यांची समोरासमोर चौकशी..तर पोलीस स्टेशनबाहेर विशाल अगरवाल यांच्या कुटुंबीयांची पत्रकारांना धक्काबुक्की

* बिघडलेली कार चालवायची परवानगी अगरवालने मुलाला दिलीच कशी? चालकाच्या कथित जबाबावर सवाल उपस्थित 

* अल्पवयीन मुलांना मद्य दिल्यास बार मालकांना ५० हजारांचा दंड, टीकेची झोड उठल्यानंतर राज्य उत्पादन शुल्क विभागाला अखेर जाग

* अहमदनगरच्या अकोलेतील प्रवरा नदीत SDRF पथकाची बोट उलटून तिघांचा मृत्यू, दोघे बचावले तर एकाचा शोध सुरु, अगोदर बुडालेल्या दोन व्यक्तीचा शोध घेताना दुर्घटना ; त्या घटनेतील दोघे जण अजुनही बेपत्ताच                                         

✍️ मोहन चौकेकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या