🌟परभणी शहरातील नाल्यांची मान्सूनपूर्व सफाई तात्काळ करा अन्यथा कचरा मनपा कार्यालयात आणून टाकू.....!


🌟प्रहार जनशक्ती पक्षाचा इशारा : जिल्हाधिकारी यांची भेट घेऊन निवेदन केले सादर केले🌟



परभणी - पावसाळा अवघ्या पंधरा दिवसावर येऊन ठेपलेला असताना परभणी शहर महानगरपालिकेच्या वतीने शहरातील मुख्य नाल्यांची तथा गटारांची मान्सूनपूर्व नालेसफाई अद्याप झालेली नाही. नियमाप्रमाणे एप्रिल महिन्याच्या शेवटी व मे महिन्याच्या सुरुवातीला मान्सूनपूर्व नालेसफाई करणे बंधनकारक असतानाही परभणी शहर महानगरपालिका प्रशासन कुंभकरणाच्या झोपेत आहे शहरातील नालेसफाई तात्काळ करण्यात यावी अन्यथा प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने शहरातील नाल्यांचा गाळ काढून मनपा कार्यालय परिसरात टाकला जाईल असा इशारा आज प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने देण्यात आला.


याबाबत प्रहार जनशक्ती पक्षाने मनपा आयुक्त व जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाचे अध्यक्ष यांना भेटून निवेदन देण्यात आले. जिल्हाधिकारी यांनी ०९ मे २४ रोजी जिल्ह्यातील सर्व विभागाचे बैठक घेऊन आपत्ती व्यवस्थापनाची सर्व कामे तत्काळ पूर्ण करण्याच्या सूचना मनपा प्रशासनासह सर्व विभागांना लेखी स्वरूपात दिल्या होत्या त्याशिवाय राज्याचे मुख्यमंत्री तथा नगर विकास मंत्री यांनी व विभागीय आयुक्त यांनी वेळोवेळी आपत्ती व्यवस्थापनाच्या कामांना तात्काळ पूर्ण करा याबाबत सूचना दिलेल्या असतानाही परभणी शहर मनपा आयुक्त यांनी या सर्व आदेशांना केराची टोपली दाखवली आहे हे अत्यंत गंभीर आहे.


मनपा कडे पैसे नाहीत म्हणून यावर्षी नालेसफाई केली जाणार नाही असा अजब निर्णय मनपा प्रशासनाच्या वतीने घेण्यात आला आहे. एकीकडे शहरातील मुख्य नाले व गटारे गाळाने तुडुंब भरलेली असताना परभणी शहर महानगरपालिका प्रशासनाने नालेसफाईकडे केलेले दुर्लक्ष शहरांमध्ये पाणी तुंबण्यासाठी कारणीभूत ठरू शकते त्याकरिता जिल्हाधिकारी यांनी जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाचे अध्यक्ष या नात्याने या प्रकरणात लक्ष घालून महानगरपालिका प्रशासनाकडून शहरातील नाल्यांची तात्काळ मान्सून पूर्व नालेसफाई करून घ्यावी असेही या निवेदनात म्हटले आहे.

निवेदनावर प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हाप्रमुख शिवलिंग बोधने, तालुकाप्रमुख उद्धव गरुड, रामेश्वर पुरी, शेख बशीर यांच्यासह अनेकांच्या स्वाक्षऱ्या आहेत......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या