🌟शालेय अभ्यासक्रमात मनुस्मृती आणि भगवद गीतेच्या समावेशाचा डेमोक्रॅटिक युथ फेडरेशन ऑफ इंडिया कडून विरोध....!


🌟निर्णय त्वरित मागे न घेतल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा दिला इशारा : जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांना दिले निवेदन🌟 

परभणी : परभणी जिल्हा डेमोक्रॅटिक युथ फेडरेशन ऑफ इंडिया कडून आज सोमवार दि.२७ मे २०२४ रोजी शालेय अभ्यासक्रमात मनुस्मृती आणि भगवद गीतेच्या काही भागांचा समावेश करत असल्याच्या निवेदेविरुद्ध जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांच्या मार्फत राज्याचे मुख्यमंत्र एकनाथ शिंदे यांना निवेदन देण्यात आले. महाराष्ट्र शासनाने निर्णय त्वरित मागे न घेतल्यास डेमोक्रॅटिक युथ फेडरेशन ऑफ इंडिया कडून तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला. शिवाय शालेय अभ्यासक्रमात संविधानातील विविध मूल्यांचा समावेश करण्यात यावा अशी सुद्धा मागणी करण्यात आली. यावेळी डेमोक्रॅटिक युथ फेडरेशन ऑफ इंडियाचे जिल्हा सचिव नसीर शेख,जिल्हा कोषाध्यक्ष जय एंगडे,डॉ.आंबेडकर नगर व म. फुले नगर समितीचे अध्यक्ष अमोल पट्टेकर, सचिव सुबोध खंदारे आणि आदित्य कांबळे उपस्थित होते......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या