🌟पत्रकार व ईतर हल्ले रोखण्यासाठी अकोला जिल्ह्यातील गुन्हेगारीला पायबंद घालावा.....!


🌟लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाचे पोलिस अधिक्षकांना निवेदन🌟


अकोला (दि.२१ मे २०२४) -: पत्रकारांवरील हल्ला प्रकरणांमध्ये पत्रकार संरक्षण कायदा लावण्याची टाळाटाळ करणे,अकोला जिल्ह्यात खूनांचे सत्र,अवैध धंद्यांतील संरक्षणातून गुन्हेगारांना अभय या प्रकारांमुळे समाजातील निरपराध आणि पत्रकार दडपणाखाली असून कायदा,सुव्यवस्था आणि शांतता धोक्यात आलेली आहे. ज्येष्ठ अधिस्विकृतीधारक पत्रकार व सामाजिक कार्यकर्ते श्री पंजाबराव वर यांना मारहाण व सौ.आश्विनी देशमुख या महिलेला शिवीगाळ आणि त्यांच्या पतीला झालेली मारहाण.,या खदान पोलिस स्टेशनच्या दोन्ही प्रकरणांत  आणि ईतर अनेक प्रकरणांमध्ये पोलिसांनी फिर्यादींऐवजी आरोपींनाच थातुर मातुर कारवायातून संरक्षित करण्याचे  काम केलेले आहे.त्यामुळे पोलिसांची अशी वाटचाल ही "सद्रक्षणाय खलनिग्रहनाय" या बिद्रवाक्याशी आणि लोकशाही तथा सामाजिक कर्तव्याशी होणारी प्रतारणा आहे. 

     ही कर्तव्य प्रतारणा टाळून पत्रकार आणि निरपराध्यांना संरक्षण देऊन समाजात विश्वास कायम करण्याच्या सुचना पोलिसांना द्याव्यात.अशी मागणी लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघ या समाजाभिमुख राष्ट्रीय संघटनेकडून संस्थापक- राष्ट्रीय अध्यक्ष संजय एम.देशमुख (निंबेकर) यांनी  अकोला जिल्हा पोलिस अधीक्षक श्री बच्चन सिंह यांची भेट घेऊन आणि दिलेल्या  पत्रातून केलेली आहे. यावेळी त्यांचेसोबत ज्येष्ठ पत्रकार नारी ललकारचे संपादक  पंजाबराव वर,लोक स्वातंत्र्य अकोला जिल्हाध्यक्ष (ग्रामीण ) वऱ्हाड वृत चे सागर लोडम,सहसचिव दिव्य विदर्भ चे मनोहर मोहोड, साप्ताहिक तपोभूमी चे रमेश समुद्रे,अकोला मेट्रोचे संतोष मोरे  साप्ता.खैरखाह चे एजाज भाई हे पत्रकार होते बाबत सहकार्याची अपेक्षा ठेवत नंतर मात्र  वरिष्ठ स्तरावरून दाद मागीतली जाईल.अशी माहिती लोक स्वातंत्र्य अध्यक्ष संजय देशमुख यांनी दिली आहे.

     निवडणूक कालावधित सभा घेण्याच्या वादातून एका राजकीय पक्षाचा कार्यकर्ता असलेल्या नितीन किसन मोरे याने पत्रकार पंजाबराव वर यांना मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिली होती. त्याचेवर  आचार संहिता भंग व  पत्रकार संरक्षण कायद्यानुसार कार्यवाही व्हावी यासाठी लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाच्या अकोला जिल्हा शाखेने पोलिस अधिक्षकांना निवेदन दिले होते.त्याचप्रमाणे दुसऱ्या प्रकरणात शिवीगाळ आणि पतीला मारहाण तथा सि.सी.टीव्ही युनिट ची तोडफोड घटनेतील मंगेश शांताराम विसपुते या गुंड प्रवृत्तीच्या आरोपीवर  कार्यवाही न झाल्याने  सौ.अश्विनी मोहन, देशमुख,प्रथमेश विला,वॉर्ड क्र.१४ या मलकापूमधील मधील सौ.आश्विनी देशमुख या गृहिणीने सुध्दा पोलिस अधिक्षकांना संरक्षण मागीतले आहे.

         या दोन्ही प्रकरणांत अपेक्षित योग्य कारवाई झालेली नाही.अकोला शहर आणि जिल्ह्यातील सतत खूनांची प्रकरणे आणि राजरोसपणे फिरत असलेल्या  गुन्हेगारी प्रवृत्तीच्या घटकांकडून  कायदा ,सुव्यवस्था आणि समाजात अशांतता निर्माण झालेली आहे.अशा प्रवृत्तींवर योग्य ती कार्यवाही ही राजकीय दबावामुळे थांबवली जाते, की पोलिसांना या प्रवृत्तींसोबतचे मधुर संबंध जोपासण्यात स्वारस्य आहे.हे प्रश्न पोलिसांच्या अनेक ठीकाणच्या  कर्तव्यातील कसून करण्याच्या लोकशाहीविरोधी कृतीतून पुढे येत आहेत. त्यामुळे याकामी प्राधान्न्याने लक्ष देऊन हाताबाहेर जाणाऱ्या या परिस्थितीला प्रतिबंध करावा  मागणी  संस्थापक- राष्ट्रीय अध्यक्ष संजय देशमुख यांनी जिल्हा पोलिस अधिक्षकांकडे केली आहे.....

========================

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या