🌟हे शब्द आज माझे...झाले मुके तरीही ते बोलतील भाषा हमखास वादळाची - ॲड.डॉ.विजयकुमार कस्तुरे चिखली


🌟देशात उसळलेल्या स्वैराचारी वातावरणावर कवितेच्या माध्यमातून केला ॲड.कस्तुरे यांनी घणाघाती आघात🌟  

 ✍️ मोहन चौकेकर 

छत्रपती संभाजीनगर (दि.१२ मे २०२४)-: स्थानिक एम्.जी.एम्. विद्यापीठाच्या नयनरम्य वनराईने नटलेल्या अद्ययावत आईनस्टाईन सभागृहामधे, नुकत्याच नेपाळ येथील अंतर्राष्ट्रीय पुरस्कार वितरण तथा कवी संमेलनाच्या यशस्वी आयोजनामुळे चर्चेत आलेल्या साहित्यधारा बहुउद्देशीय सेवाभावी संस्था, छ. संभाजीनगर तर्फे आयोजित ' चलो बुध्दकी ओर ' संमेलनामधे सहभागी निमंत्रित कविंच्या, सादर करण्यात आलेल्या कवितांचा, आपल्या धडाकेबाज समालोचनीय आढावा घेणाऱ्या अध्यक्षीय भाषणातून डॉ. विजयकुमार कस्तुरे, ॲडव्होकेट, चिखली यांनी वरीलप्रमाणे उदगार  काढून सर्वांना अंतर्मुख केले. एवढेच नाही तर, भगवान बुध्दाच्या मानवी कल्याणाच्या विज्ञानवादी मार्गावरील अपर्यायी वाटचालीवरील - चलो बुध्दकी ओर - ही गेय कविता सादर करून आजच्या, देशात उसळलेल्या स्वैराचारी वातावरणावर घणाघाती आघात करीत -

माझ्याच घराला मी

लावीन आग जेव्हा  ! 

हिरोशिमा कधीही

तमचे करीन तेव्हा !! 

हा संदेशही कवी, लेखक, साहित्यिक यांना देऊन, देश चालविणारापेक्षा देश घडविणारे मोठे असतात, त्यामुळे या भयग्रस्त परिस्थितीला बदलायची जबाबदारी तुमची असून ते करण्यात तुम्ही कोणत्याही दबावाला किंवा प्रलोभनाला बळी न पडता या देशाला सावरण्यासाठी निर्भीडपणे आपल्या लेखणीला व्यक्त होण्याची संधी दिली पाहिजे, असे भावनिक आवाहनही करून आजकाल काही बोटावर मोजण्याइतक्या साहित्यिकांना सोडल्यास, बाकीच्यां च्या मुर्दाड  व लांगूलचालनी वृत्तीस त्यांनी सोडून, देश सावरण्यासाठी आपली लेखणी सदा परजण्यास तत्पर असावे ही हाक सुध्दा दिली. या परिवर्तनवादी वैचारिक अधिष्ठानाच्या कार्यक्रमात अंध अवडंबरवादी परंपरांच्या विरूध्द पेटलेल्या शब्दांचे निखारे आपल्या लिखाण व काव्यातून मांडणाऱ्या छ. संभाजीनगर च्या डॉ. तस्निम पटेल, आपला उध्दार आपल्या हाती, सांगणाऱ्या प्रा.डॉ. सुनिता कावले, बदल घडवण्याशिवाय पर्याय नाही, पण त्यासाठी घरात बसून चालणार नाही, हा क्रान्तिचा संदेश देणाऱ्या मा. वैशाली खंडारे आणि मा. आरती जाधव यानी सुध्दा आपल्या भाषणातून व कवितांद्वारे उपस्थित सर्व कवी - कवयित्रींना आत्मचिंतित करून मोलाचे मार्गदर्शन केले. याप्रसंगी महाराष्ट्रातील नामवंत कवी डॉ. डी. व्ही. खरात, चिखली, नागोराव सोनकुसरे, नागपूर, गोविंद पाठक, बीड, रमेश खंडारे व विद्या सरपाते, बुलढाणा, शीतल शेगोकार, शेगाव, अंकुश पडघान, बोरगाव काकडे वगैरे अनेक कवि - कवयित्री यांनी आपल्या काव्यरचनेद्वारे प्रबोधन केले. तर सुरूवातीला बुध्द वंदना होऊन निशिगंधा मानवतकर यांनी आपल्या अत्यंत मधूर आवाजातील स्वागतगीताने सर्व मान्यवरांचे स्वागत केले तर पहिल्या सत्रातील पुरस्कार वितरण सोहळ्याचे सुत्रसंचालन जालन्याचे साहित्यिक मा. अमोल भिलंगे यांनी तर दुपारच्या सत्रातील कवी संमेलनाचे सुत्रसंचालन छ. संभाजीनगरचे संदीप ढाकणे, यांनी समर्थपणे केले. कार्यक्रमाचे सुंदर आयोजन तथा नियोजन संस्था अध्यक्ष डॉ. संघर्ष सावळे, यांनी करून मा. मिलिंद कांबळे, मा. कविता पडळकर, मास्टर उत्कर्ष सावळे इ. च्या अथक परिश्रमाने या समारंभाची यशस्वी सांगता झाली......

 ✍️ मोहन चौकेकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या