🌟शरीर फिट राहण्यासाठी पौष्टिक आहाराच्या सेवनासोबत नियमित व्यायाम करणे आवश्यक.....!


🌟शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार प्राप्त सागर गुल्हाने यांचे मत🌟

फुलचंद भगत

वाशिम:-धावपळीच्या युगामध्ये आपल्या जीवनशैलीत बरेच बदल घडून आले आहेत पण काही लोक कामाचे गणित जुळवताना आरोग्याची घडी बसवायला विसरले.शरीर आणि मानसिक आरोग्य उत्तम राहण्यासाठी पुरेशी झोप पौष्टिक आहार व व्यायामा सोबतच चुकीची सवय देखील सोडाव्या लागतात याचाच विसर अनेकांना पडला प्रबळ इच्छाशक्ती आणि वेळेचा योग्य वापर याच्या मदतीने बदललेली जीवनशैली पूर्वपदावर आणू शकता फिट राहण्यासाठी तुमच्या जीवनशैलीत कोणते बदल कराल जाणून घेऊया याविषयी माहिती दिली फायदे अनेक काळ्या मनुक्यामध्ये औषधी गुणधर्म  आढळतात असे तज्ञ सांगतात  काळ्या मनुकाच्या समावेश आहारात केल्याने हृदयविकाराचा  आणि मधुमेय होण्याचा धोका कमी होतो शिवाय काळ्या मनुक्याच्या अर्कामध्ये रक्तातील साखरेचे प्रमाण आटोक्यात आणण्याची क्षमता असते मनुक्यामध्ये  नैसर्गिक साखर असल्याने त्याचे सेवनाने शरीरात अतिरिक्त साखर जाण्याचा धोका निर्माण होत नाही व्यायामाला  शॉर्टकट नसतो व्यायाम करण्यासाठी पुरेसा वेळ देता येत नाही अशी तक्रार बरेच जण करतात  कमी वेळात जास्तीत शारीरिक हालचाल करण्यासाठी अनेक वर्कआउट तुम्हाला नक्कीच मदत करेल एका संशोधनात सिद्ध झाले आहे की आठवड्यातून तीन वेळा दहा मिनिटांसाठी वर्कआउट व्यायाम केल्यास फायदेशीर ठरू शकतात उत्तम आरोग्यासाठी पोषक आहाराचे सेवन करणे आवश्यक आहे.

                  शरीराच्या वाढीसाठी महत्त्वाच्या असणाऱ्या पौष्टिक सेवन करणे आवश्यक आहे या सोबतच शरीरात गेलेल्या पोषणद्रव्याच्या योग्य प्रकारे पचन होण्यास तितकेच गरजेचे आहे.ऊदाहरणार्थ "क" जीवनसत्व भरपूर प्रमाणात असणाऱ्या संत्र्याचा रसाचा सेवन करा चरबीयुक्त पदार्थ पचनासाठी पचनासाठी  "अ" "ड" "इ" आणि "क" याचे सेवन  करण्यास आहार तज्ञ सांगतात त्याचबरोबरीने  तिळाचे तेल कोशिंबिरी आणि फळ खाण्याचा सल्ला देखील तज्ञ देतात......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या