🌟थायलंड येथील बुध्द पोर्णिमे निमित्त आयोजित समारंभास भीमराव हत्तीअंबीरे यांना निमंत्रण.....!


🌟थायलंड बुध्दिस्ट ऑर्गनाजेशन व धम्मकाया फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने कार्यक्रमाचे आयोजन🌟 

 परभणी (दि.१३ मे २०२४) : थायलंड येथील धम्मकाया फाऊंडेशनच्या वतीने बुध्द पोर्णिमे निमित्त आयोजित केलेल्या समारंभास प्रमुख अतिथी म्हणुन संबोधी अकादमीचे अध्यक्ष समाजभूषण भीमराव हत्ती अंबीरे यांना निमंत्रण मिळाले आहे.

               थायलंड येथील धम्मकाया फाऊंडेशन ही जगातील ३० देशांमधील ७५ पेक्षा अधिक संघटनांसोबत बुध्द धम्माची प्रसार, प्रचार करणारी आंतरराष्ट्रीय स्तरावरील ख्यातनाम संस्था आहे. वैशाख डे (बुध्द पोर्णिमा) निमित्त धम्मकाया फाऊंडेशन व थायलंड बुध्दिस्ट ऑर्गनाजेशन यांच्या संयुक्त विद्यमाने २१ में ते २४ मे २०२४ दरम्यान समारंभ आयोजित करण्यात आला आहे. या समारंभास अनेक देशामधुन हजारो लोक उपस्थित राहतात. प्रमुख अतिथी यांचे जाण्या येण्याचा, राहण्याचा व थायलंड येथील प्रसिध्द धार्मिक स्थळांचा भेटीचा खर्च आयोजकाकडुन करण्यात येतो. याच समारंभाकरीता संबोधी अकादमी महाराष्ट्रचे अध्यक्ष समाजभूषण भीमराव हत्तीअंबीरे यांना प्रमुख अतिथी म्हणुन निमंत्रित करण्यात आले आहे.

              दरम्यान, हत्तीअंबीरे यांना हे निमंत्रण मिळाल्याबद्दल डॉ. अरविंद सावते, भगवान जगताप, शेषेराव जल्लारे, सिध्दार्थ भराडे, गौतम मुंढे, भीमराव पतंगे, दि.फ. लोंढे, डि. आर. तुपसुंदर, गौतम साळवे, यादव घोडके, विश्वनाथ डबडे, गौतम कठाळे, भीमराव धबाले, राजेश चांदणे, संभाजी खिल्लारे, गंगाधर परसोडे, धनंजय रणवीर, हेमंत घुगे, त्रिशरण वाटोडे, सुरेश मगरे, सचिनराजे हत्तीअंबीरे, अविनाश मालसमींदर, नवनाथ जाधव, दिलीप पाटील, भगवान मानकर, बद्रीनाथ घुले, रामप्रसाद घुगे, बालाली भुसारे, अनिरुध्द धरपडे आदींनी अभिनंदन करुन शुभच्छा दिल्या आहेत......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या