🌟परभणी शहरातील गंगाखेड रोडवर झालेल्या अपघातात एकाचा दुर्दैवी मृत्यू ; एक जखमी....!🌟या अपघातात ओमकार सातपुते याचा मृत्यू झाला तर अमोल लांडगे हा जखमी झाला आहे🌟

परभणी (दि.२८ मे २०२४) : परभणी शहरातील गंगाखेड रोडवर काल सोमवार दि.२७ मे २०२४ रोजी रात्री एका जड वाहनाने दुचाकीला धडक दिलेल्या जोरदार धडकेत एकाचा दुर्दैवी मृत्यू झाला तर एकजण जखमी झाल्याची घटना घडली आहे.

ओमकार उध्दव सातपुते वय १७ वर्ष राहणार आनंद नगर व अमोल बालाजी लांडगे वय २७ वर्षे हे दोघे सोमवारी रात्री दुचाकीवरुन गंगाखेडकडून परभणीला येत होते. यावेळी गंगाखेड रोडवरील मामु कॉफी सेंटर जवळ पाठीमागून आलेल्या एका जड वाहनाने दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातात ओमकार सातपुते याचा मृत्यू झाला तर अमोल लांडगे हा जखमी झाला आहे.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या