🌟आचारसंहिता संपल्यानंतर मैदानी चाचणी व त्या पाठोपाठ लेखी परिक्षांचा निर्णय घेतला🌟
परभणी (दि.०९ मे २०२४) : परभणी जिल्हा पोलिस दलातील शिपाई,चालकांच्या १४१ पदांकरीता एकूण १२ हजार २० अर्ज दाखल झाले आहेत.
जिल्हा पोलिस दलातील रिक्त पदांच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या गृह खात्याने दिलेल्या सूचनेप्रमाणे स्थानिक प्रशासनाने पोलिस भरतीची प्रक्रिया सुरु केली. शिपाई व चालकांच्या १४१ पदांकरीता ऑनलाईन पध्दतीने अर्जही मागविले त्यास उमेदवारांनी जोरदार प्रतिसाद दिला व विहीत नमून्यात १२ हजार २० अर्ज दाखल झाले. त्यामुळे पोलिस प्रशासन सुद्धा कमालीचे हादरले. एवढ्या मोठ्या प्रमाणावर अर्ज दाखल झाल्यानंतर प्रशासनाने आता आचारसंहिता संपल्यानंतर मैदानी चाचणी व त्या पाठोपाठ लेखी परिक्षांचा निर्णय घेतला आहे.......
0 टिप्पण्या