पेरणीपूर्वी सोयाबीनची उगवण शक्ती तपासणे गरजेचे - डॉ.गजानन गडदे


🌟परभणी तालुक्यातील ब्राह्मणगावात सोयाबीन बियाणांची उगवण शक्ती तपासणी प्रात्यक्षिक आयोजना प्रसंगी ते म्हणाले🌟 


परभणी (दि.१४ मे २०२४) - खरीप पूर्व नियोजनाच्या अनुषंगाने वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ परभणी अंतर्गत कृषी तंत्रज्ञान माहिती केंद्र ,परभणी रिलायन्स फाउंडेशन आणि महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम) यांच्या संयुक्त विद्यमाने ब्राह्मणगाव ता जि परभणी येथे महिला शेतकऱ्यांन करिता सोयाबीन बियाणांची उगवण शक्ती तपासण्याचे प्रात्यक्षिकाचे आयोजन करण्यात आले होते. 


याप्रसंगी डॉ.गजानन गडदे, विस्तार कृषी विद्यावेता तथा व्यवस्थापक यांनी सोयाबीन उगवण शक्तीचे प्रात्यक्षिक प्रत्यक्ष करून दाखविले आणि सोयाबीन बियाणाची उगवन शक्ती 70 टक्के पेक्षा जास्त असणे आवश्यक आहे असे त्यांनी महिला शेतकऱ्यांना सांगितले. तसेच सोयाबीन लागवड तंत्रज्ञानाविषया बाबत सुद्धा डॉ. गडदे यांनी सखोल मार्गदर्शन केले. माविमचे जिल्हा समन्वयक ,श्री बाळासाहेब झिंगार्डे यांनी महिला शेतकऱ्यांना बचत गट सक्षम करणे तसेच कृषिशी निगडीत जोडधंदे उभारण्यामध्ये महिलांनी पुढाकार  घेण्याचे आवाहन केले. सदरील कार्यक्रमास गावातील 50 50 ते 55 महिला शेतकरी उपस्थित होत्या. तसेच सदरील कार्यक्रमास गावचे तंटामुक्तीचे अध्यक्ष श्री काळदाते यांची प्रमुख उपस्थिती होती.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन  माविमच्या सौ. भालेराव मॅडम यांनी केले तर आभार प्रदर्शन रिलायन्स फाउंडेशन चे श्रीरामा राऊत यांनी केले. सदरील कार्यक्रम यशस्वी  करण्याकरिता श्री शेळके यांनी प्रयत्न केले.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या