🌟परभणी जिल्ह्यातील संभाव्य पाणीटंचाईवर मात करण्यासाठी सर्वतोपरी उपाययोजना करा - जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे


🌟जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित पाणी टंचाई आढावा बैठकीत जिल्हाधिकारी श्री.गावडे बोलत होते🌟


परभणी (दि.15 मे 2024)  : चांगला पाऊस होण्यासाठी अवधी असून, या टंचाईच्या  कालावधीत जिल्ह्यातील जनावरांसह नागरिकांना पाणी पुरेल, अशा सर्व उपाययोजना करण्यात येतील. त्यासाठी आवश्यकता पडल्यास विहीर-कुपनलिकांचे अधिग्रहण करण्यात येईल. तसेच आगामी काळातील संभाव्य पाणीटंचाईवर मात करण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून सर्व उपाययोजना करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी संबंधित यंत्रणेला आज दिल्या. जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित पाणी टंचाई आढावा बैठकीत जिल्हाधिकारी श्री.गावडे बोलत होते. 

यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी विनय मून, निवासी उपजिल्हाधिकारी श्रीमती अनुराधा ढालकरी, उपविभागीय अधिकारी दत्तु शेवाळे, तहसीलदार, गटविकास अधिकारी, जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. पी. पी. नेमाडे, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. नामदेव आघाव यांच्यासह जिल्हा प्रशासनातील अधिकारी यावेळी उपस्थित होते. 

यावेळी जिल्हाधिकारी श्री. गावडे यांनी जिल्ह्यातील मागणी केलेल्या  पाणीपुरवठा करणाऱ्या टँकरचा आढावा घेतला. तसेच आवश्यक त्या गावांमध्ये पाणीपुरवठा करणाऱ्या जलस्त्रोतांचे अधिग्रहण करून नागरिकांना पाणीपुरवठा करण्यास प्राधान्य देण्यास सांगितले. तसेच याकामी किरकोळ दुरुस्ती असल्यास अशा कुपनलिकांवरील हातपंप, विहिरीवरील पंपांची तात्काळ दुरुस्ती करून घ्यावी. तसेच गावातील पारंपरिक जलस्त्रोत कोरडे पडले असल्याची पूर्णत: खात्री झाल्यावरच विहिरी आणि कुपनलिकांच्या अधिग्रहणाची प्रक्रिया पार पाडण्याचे निर्देश जिल्हाधिकारी श्री. गावडे यांनी यंत्रणेच्या अधिकाऱ्यांना दिले. 

जिल्ह्यात 10 गावे आणि 7 वाडी-तांड्यांना 14 खासगी टँकर्सद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत असून, यामध्ये सर्वाधिक जिंतूर तालुक्यातील 9 गावांचा समावेश आहे. त्यानंतर गंगाखेड 4 तर सोनपेठ तालुक्यातील एका गावाला टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. तर याव्यतिरिक्त जिल्ह्यात 76 गावांसाठी  104 खासगी विहिरी पिण्याच्या पाण्यासाठी अधिग्रहित करण्यात आल्या आहेत. यामध्ये गंगाखेड तालुक्यात 41 गावांसाठी 65 विहिरी अधिग्रहीत केल्या असून, सोनपेठ तालुक्यातील 16 गावांमध्ये 18 अधिग्रहित विहिरींच्या माध्यमातून पाणीपुरवठा करण्यात येत आहे. सेलू तालुक्यातील 8 गावांना 9 खासगी विहिरींचे पाण्यासाठी अधिग्रहण करण्यात आले आहे. जिंतूर तालुक्यात 5 गावांमधील 6 विहिरींच्या माध्यमातून पुरवठा करण्यात येत आहे. पालम तालुक्यातील 4 गावांना 4, पुर्णा आणि मानवत तालुक्यात प्रत्येकी एका गावात एका विहिरीतून पाणीपुरवठा करण्यात येत असल्याचे जिल्हाधिकारी श्री. गावडे यांनी सांगितले.  

ग्रामीण भागातील पाणी टंचाई निवारणार्थ विंधन विहिरी/कूपनलिका घेणे, नळ योजनांची विशष दुरुस्ती करणे, विंधन विहिरींची विशेष दुरुस्ती करणे, तात्पुरत्या पुरक नळ योजना घेणे, टँकरने पाणी पुरवठा करणे, खाजगी विहिर अधिग्रहण करणे, विहिर खोल करणे/गाळ काढणे, बुडक्या घेणे इत्यादी उपाययोजनांचा कृती आराखड्यात समावेश आहे.

जिल्ह्यातील लघु, मध्यम आणि मोठ्या प्रकल्पातील उपलब्ध पाणीसाठ्याचा आढावा घेतला. तसेच या प्रकल्पात सद्यस्थितीत उपलब्ध पाणीसाठा पिण्यासाठी आरक्षित करून तो वापरण्यात यावा, अशा सूचना दिल्या. जिल्ह्या तील 2 मध्यउम व 22 लघु प्रकल्पाकपैकी 4 लघु प्रकल्पासमध्ये  अत्य्ल्पत पाणीसाठा आहे. बाकीचे प्रकल्पस कोरडे आहेत. जिल्ह्या तील सर्वच कोल्हाापुरी बंधारे देखील कोरडे पडले असून, उपलब्ध जलस्त्रोतांमधून जीवंत पाणीसाठ्यातून नागरिकांना पाणीपुरवठा करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी दिले आहेत. जलजीवन मिशन योजना, हर घर नल से जल आदि पाणीपुरवठ्याशी संबंधित योजनांची प्रगतीपथावर असलेली कामे तात्काळ पूर्ण करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी अधिकाऱ्यांना दिले. तसेच पाणीटंचाई आराखड्यातील प्रस्तावित योजनांचा आढावाही यावेळी घेण्यात आला 

यावेळी जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी जिल्ह्यात जनावरांसाठी उपलब्ध असलेल्या चारासाठ्याचा आढावा घेतला. तसेच येत्या पावसाळ्यापर्यंत पुरेल असे चाऱ्याचे नियोजन करण्याच्या सूचना दिल्या. आवश्यकता असल्यास वैरण विकास योजनेतंर्गंत शेतकऱ्यांना हिरवा चारा बियाणे उपलब्ध करून देण्या्चे निर्देशही त्यांनी संबंधित विभागाला दिले. जिल्ह्यातील पशुधनाचे इयर टॅगींग करण्या्चे शासनाने निर्देश दिले असून, पशुपालकांनी इयर टॅगींग करून घेण्याचे आवाहनही करण्यात आले आहे. पशुसंवर्धन विभाग व संबंधित यंत्रणांनी यावर तात्काळ कार्यवाही पूर्ण करावी. जेणे करुन नैसर्गिक आपत्तीमध्ये  पशु दगावल्यास त्यांना विमा व अनुदान देण्यास अडचण येणार नसल्याचे त्यांनी सांगितले......

*****

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या