🌟महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या सेवानिवृत्त कर्मचार्‍यांना सातव्या वेतन आयोगाची थकबाकी तात्काळ द्या.....!


🌟महाराष्ट्र जीवन प्राधीकरण कर्मचारी महासंघाची मागणी🌟

परभणी (दि.१८ मे २०२४) : महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या सेवानिवृत्त कर्मचार्‍यांना सातव्या वेतन आयोगानुसार फरकाचे दोन हप्ते अदा करण्यात आले परंतु कार्यरत कर्मचार्‍यांना सातव्या वेतन आयोगानुसार वेतनाच्या फरकाची रक्कम मिळाली नसल्यामुळे कर्मचार्‍यांमध्ये कमालीची नाराजी आहे त्यामुळे सातव्या वेतन आयोगाची थकबाकी तात्काळ द्यावी अशी मागणी होत आहे.

            महाराष्ट्र जीवन प्राधीकरण कर्मचारी महासंघाचे सरचिटणीस राजाराम विठाळकर यांनी प्राधिकरणच्या सदस्य सचिवांना एक निवेदन पाठवले आहे. त्याद्वारे, शासनाच्या निर्णयानुसार ०१ एप्रिल २०१७ पासून महाराष्ट्र जीवन प्राधिकरणातील कार्यरत अधिकारी, कर्मचार्‍यांना सातवा वेतन आयोग लागू करण्यात आला आहे. राज्य शासकीय-निमशासकीय कर्मचार्‍यांना थकबाकीचे चार हफ्ते अदा करण्यात आले. त्याचबरोबर वाहतूक भत्ता, घरभाडे भत्ताही लागू करण्यात आला होता. परंतु, त्यानंतर मात्र सातवा वेतन लागू करुन ३१ महिन्यांचा कालावधी पूर्ण होवूनसुध्दा थकबाकी, वाहतूक व घरभाडे भत्ता अद्यापही लागू करण्यात आला नाही, अशी खंत विठाळकर यांनी व्यक्त केले.

            काही कार्यरत कर्मचारी आता सेवानिवृत्त झाले असून त्यांना अर्जीत रजेचा फरकसुद्धा देण्यात आलेला नाही. निवृत्तांना दोन थकबाकी हफ्ते अदा करण्यात आले आहेत. निधी नाही या सबबीखाली कार्यरतांना त्यांचे हक्कापासून वंचित ठेवण्यात आले आहे. त्यामुळे महाराष्ट्र जीवन प्राधिकरच्या कार्यरत अधिकारी, कर्मचार्‍यांमध्ये प्रचंड नाराजी असून अशा प्रकारे भेदभाव करणे योग्य नाही, असे निवेदनात म्हटले आहे. याबाबत वरिष्ठस्तरावर त्वरीत कार्यवाही व्हावी, अशी अपेक्षा विठाळकर यांनी व्यक्त केली आहे......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या