🌟वाशिम येथे गप्पी मासे पाळा डेंगु रोगापासून दुर रहा पोस्टर व रॅली जनजागृती अभियान संपन्न.....!


🌟जनजागृती अभियानात श्री बाकलीवाल विद्यालयाच्या ४८ एनसीसी विद्यार्थ्यांचा सहभाग🌟


फुलचंद भगत

वाशिम - राष्ट्रीय डेंगु प्रतिबंधक दिनानिमित्त ‘गप्पी मासे पाळा, डेंगु रोगापासून दुर रहा’ अशा घोषणा देत स्थानिक श्री बाकलीवाल विद्यालयाच्या ४८ एनसीसी विद्यार्थ्यांनी गुरुवार, १६ मे रोजी शहरात पोस्टर व जनजागृती रॅली काढून नागरीकांमध्ये अत्यंत घातक अशा डेंगु रोगाबाबत जनजागृती केली हा समाजसेवी उपक्रम राष्ट्रीय कीटकजन्य रोग नियंत्रण कार्यक्रम अंतर्गत जिल्हा हिवताप कार्यक्रम कार्यालय, जिल्हा रुग्णालयाच्या वतीने तसेच जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अनिल कावरखे, जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. पांडुरंग ठोंबरे, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संगीता देशमुख,डॉ.रामहरी बेले यांच्या मार्गदर्शनात राबविण्यात आला.


डेंग्यू प्रतिबंधक उपाययोजना संबंधित लोकांमध्ये जनजागृती व्हावी या उद्देशाने आयोजीत प्रभातफेरी व पोस्टर स्पर्धेमध्ये बाकलीवाल विद्यालयाच्या ४८ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. या स्पर्धेत प्रथम क्रमांक भूमिका ठवकर, द्वितीय चंचल ठाकूर, तृतीय प्रसाद गोळे या विद्यार्थ्यांना सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. विद्यार्थ्यांनी  डेंग्यू प्रतिबंधक उपाय योजनाबाबत घोषणा देत शहरभर रॅली काढली. त्यामध्ये पाण्याचे साठे आठवड्यातून एकदा पूर्ण रिकामी करणे, संपूर्ण अंग झाकतील असे कपडे वापरणे, लहान मुलांना मच्छरदाणीत झोपवावे, सतत ताप आल्यास रक्त तपासणी करून घ्यावी, साठवलेल्या पाण्यात गप्पी मासे सोडावे. जिथे शक्य नाही तिथे कीटकनाशकाचा वापर करावा. परिसर स्वच्छ ठेवावा. धुरफवारणी करावी. डेंगू तापाची लक्षणे आढळल्यास त्वरित शासकीय रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा आदी माहिती या जनजागृती पोस्टर रॅलीदरम्यान जनतेला देण्यात आली. भूमिका ठवकर या एनसीसी विद्यार्थीनीनी कागदाव्दारे बनविलेली डेंगु मच्छराची हुबेहुब प्रतिकृती या रॅलीतील प्रमुख आकर्षण ठरली. या रॅलीमध्ये एनसीसी अधिकारी अमोल काळे, जिल्हा सामान्य रुग्णालयाचे आरोग्य निरीक्षक नितीन व्यवहारे, रमेश दहातोंडे, जिल्हा हिवताप कार्यालयातील कोकरे, चोरमल, कापसे, जाधव, सोनवणे, गोटे, कोल्हे, गवारे, राठोड तसेच सर्व कर्मचारी, राष्ट्रीय छात्र सेनेचे बाकलीवाल विद्यालयाचे विद्यार्थी, आशा वर्कर व अधिकारी कर्मचारी सहभागी झाले होते. या सर्व विद्यार्थ्यांचे बाकलीवाल चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष अ‍ॅड. सुरेंद्रकुमार बाकलीवाल, शाळेचे मुख्याध्यापक बबनराव बिल्लारी, उपमुख्याध्यापक दंभीवाल, पर्यवेक्षिका सौ. भोंडे, एनसीसी अमोल काळे यांनी कौतुक केले......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या