🌟वाशिम जिल्ह्यातील शेलुबाजार येथील निर्मला देवी जैन शाळेचे उत्कृष्ट निकाल विद्यार्थ्यांमध्ये आनंद.....!


🌟संस्थेकडून यशस्वी विद्यार्थ्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत🌟

फुलचंद भगत

वाशिम :- दरवर्षीप्रमाणे याही वर्षी सुद्धा मुलींनी बाजी मारत चांगल्या मार्काने संख्या मुलींची वाढत आहे व उत्कृष्ट निकाल निर्मला देवी जैन स्कूल शेलुबाजार संस्थेचे दरवर्षी असते दहावी मध्ये उत्तीर्ण विद्यार्थी कु. साक्षी मो पवार 94. कु.सानिका दिलीप येवले 93.40% टक्के. तनवी ग राऊत 93.कु. अमन ग तायडे 93.कुुं. खुशी माळेकर 92.निधी चांभारे 92.कु वैष्णवी गायकवाड 92.कु सारंगी बारड 91आदर्श मनवर 91.प्रणव सुर्वे. 91.गायत्री कावरे 90.संचीता घुगे 89.टक्के मार्क्स मिळवून घवघवीत यश संपादन केले आपल्या यशाचे श्रेय संस्थेचे अध्यक्ष प्रा. रजनीशजी कर्नावट व तसेच संस्थेचे मुख्याध्यापक व शिक्षक शिक्षिका आणि आई-वडील यांना देऊन मोठ्या जिद्दी चिकाटीने रात्र दिवस एक करून अभ्यासाला महत्त्व देऊन उत्तीर्ण झाले.विद्यार्थ्यांनी चांगले यशस्वी मार्क्स  मिळाल्यामुळे आनंद व्यक्त होत आहे. अनेक ठिकाणी स्वागत करून कौतुक करण्यात येत आहे या आनंदमय सोहळा निमित्त सर्वांनी आशीर्वाद दिला व विद्यार्थ्यांचे पालक वर्ग व तसेच दिलीप येवले यांनी संस्थेचे अध्यक्ष शिक्षक शिक्षिका व तसेच गावकरी मंडळी कडून आभार मानण्यात आले व पुढच्या वाटचालीकरिता घवघवीत यश संपादन करावे असे उत्तीर्ण झालेले विद्यार्थ्यांना आशीर्वाद दिले.संस्थेकडून सर्वांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले व पुढच्या शिक्षणाकरिता भरगच्च आशीर्वाद दिले.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या