🌟विजतारांच्या घर्षणा मुळे ऊसासह शेती अवजारे आणि जिवनावष्यक वस्तु जळून खाक...!


🌟पाथरी तालुक्यातील डोंगरगाव येथील घटना : लाखों रुपयांचे नुकसान🌟

 🌟नुकसान भरपाई देण्याची शेतकऱ्याने निवेदनाव्दारे केली विजवितरण कंपणीकडे मागणी🌟

प्रतिनिधी

पाथरी :- पाथरी तालुक्यातील डोंगरगाव येथे शनिवार २५ मे रोजी रात्रीच्या सुमारास विजतारांचे एकमेकांना चिटकून घर्षण झाल्याने शेतातील जनावरांच्या चा-या सह साडेचार एकरातील ऊसाचे पिक ठिबक सह जळून गेल्याची घटना घडली असुन नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतक-यांने निवेदना व्दारे विजवितरण कंपणी कडे केली आहे.

या विषयी डोंगरगाव येथील शेतकरी नामदेव साहेबराव काळे यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की,त्यांची डोंगरगाव शिवारातील गट नं. ६२ मध्ये दोन मुले आणि सुनेच्या नावाने शेतजमिन असून २५ मे शनिवारी रात्री साडे अकराच्या सुमारास विजेच्या तारांच्या घर्षणा मुळे २५०० कडबा,साडेचार एकरातील ठिबक सह ऊसाचे पिक,तीन स्प्रिंकलर सेट,फवारे,शेती अवजारा सह जिवनावश्यक वस्तू जळून गेल्याने लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.शेती हेच उपजिविकेचे साधन असल्याने आणि सर्व साधने विजतारांच्या घर्षणा मुळे जळून गेल्याने आपल्याला विजवितरण कंपनी कडून नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी २७ मे रोजी निवेदना व्दारे काळे यांनी पाथरीच्या विजवितरण कार्यालयाला आणि उपविभागिय अधिकारी यांना केली आहे......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या