🌟मुंबई येथून डिझेल घेऊन पुर्णेकडे निघालेल्या डिझेल टँकरला ताडकळस येथे दुरुस्त करीत असतांनाच लागली आग.....!


🌟मुंबईहून पुर्णा जंक्शन येथे डिझेल घेऊन निघालेले डिझेल टँकर रेल्वे डिझेल डेपोला डिझेल पुरवठा करणारे तर नाही ना ?🌟


पुर्णा (दि.२२ मे २०२४) - मुंबई येथून पूर्णा जंक्शन येथील रेल्वे डिझेल डेपोला डिझेल पुरवठा करण्याचे टेंडर रिलायन्स कंपनीला देण्यात आलेले आहे त्यामुळे दररोज अनेक डिझेल टँकरद्वारे डिझेल पुरवठा होत असतो असेच एक डिझेल टँकर मुंबई येथून पुर्णा जंक्शनकडे काल मंगळवार दि.२१ मे २०२४ रोजी आले खरे परंतु डिझेल टँकर मध्ये काहीतरी बिघाड झाल्याचे कारण दाखवून संबंधित डिझेल टँकर चालकाने ताडकळस येथील मधला मार्ग क्रमांक ६१ वरील ताडकळस पोलीस स्थानकाच्या नुतन इमारती समोर रात्री ०८.३० ते ०९-०० वाजेच्या सुमारास डिझेल टँकर थांबवून कुंडलीक लेंडाळे यांच्या वेल्डिंग वर्क शॉपवर थांबवून डिझेल टँकरच्या वरील झाकणाला वेल्डिंग करण्यास सांगितले संबंधित वेल्डिंग वर्क शॉप चालकाने वेल्डिंग करण्यास मनाई केली व भरलेल्या डिझेल टँकरला वेल्डिंग करणे धोकादायक असल्याचे सांगितले परंतु टँकर चालक अशोक मधुकर शिंगोटे याने काही होत नाही तुला कळते का मला असे म्हणून टँकरला वेल्डिंग मारण्यास भाग पाडले आणि अवघ्या काही क्षणात टँकरला भयंकर आग लागली सदरील परीसरात दोन्ही बाजूला नागरी वसाहत असल्यामुळे याचे भयंकर दुष्परिणाम लक्षात घेऊन ताडकळस पोलीस स्थानकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक कपील शेळके यांनी घटनास्थळावर जमा झालेल्या नागरिकांना तेथून पांगवून संबंधित टँकर चालकाला डिझेल टँकर गावाबाहेर घेऊन जाण्यास भाग पाडले संबंधित टँकर चालकाने ताडकळस येथून सिंगणापूर मार्गावर ताडकळस पासून जवळपास एक किलोमीटर दुर टँकर नेऊन उभे केले टँकर मधील डिझेल संपेपर्यंत अर्धा तास टँकर जळत राहीले त्यांनंतर आग विझल्याचे समजते ताडकळस पोलीस स्थानकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक कपील शेळके यांनी वेळीच योग्य निर्णय घेतला नसता तर फार मोठी जिवित हाणी झाली असती.

या संदर्भात सविस्तर वृत्त असे की ताडकळस-सिंगणापूर मार्गावर गॅरेज/वेल्डिंग वर्क शॉप तसेच चहा नाश्ता साठी हॉटेल्स वगैरे आहेत म्हणून नेहमीच या ठिकाणी येणारी जाणारी बरीचशी वाहने थांबत असतात तसेच पुर्णा रेल्वे डिझेल डेपोला डिझेल पुरवठा करणारे रिलायन्स कंपनीचे डिझेल टँकरही थांबत असतात त्यापैकीच एम.एच.१२ युएम ०४१५ हे डिझेल टँकर टँकर चालक अशोक मधुकर शिंगोटे राहणार पिंपळगाव तालुका वाशी जिल्हा धाराशिव उस्मानाबाद या चालकाने काल मंगळवार दि.२१ मे २०२४ रोजी ०८.३० वाजेच्या सुमारास टँकरला काही तांत्रिक बिघाड असल्याचे कारण दाखवून ताडकळस येथील कुंडलीक लेंडाळे यांच्या वेल्डिंग वर्क शॉप (गॅरेज) वर उभे केले तेव्हा डिझेल भरलेल्या टँकरच्या वरील झाकणाला बेजबाबदारपणे वेल्डिंग मारत असताना टँकरच्या चार रकान्यापैकी एका रकान्याला भिषण आग लागली सदरील आग अवघ्या दहा मिनिटात वेगाने वाढत गेली घटनेची माहिती सपोनि.शेळके यांना समजताच त्यांनी टॅंकर चालकाला डिझेल टॅंकर ताडकळस बाहेर नागरिक वसाहती पासून दुर नेण्यास सांगितले त्यामुळे सुदैवाने कोणतीही जीवित हानी झाली नाही आग इतकी भिषण होती की पाणी तसेच अग्निशमन पंपानेही आटोक्यात आली नाही चार रकान्यापैकी ज्या रकान्याला आग लागली होती त्या रकान्यातले डिझेल संपेपर्यंत आग विझली नाही ज्या वेल्डिंग वर्क शॉप समोर डिझेल टँकर उभे होते त्या वेल्डिंग वर्क शॉपचे मालक लेंडाळे यांनी सांगितले की आम्ही पेट्रोल डिझेलच्या टँकरचे काम करीत नाही तेव्हा टँकर चालकाने सांगितले की टँकर मध्ये डिझेल नाही तर डिझेल बनवण्यासाठी कच्चामाल म्हणजेच मळी घेऊन जात आहोत विशेष म्हणजे ज्या ठिकाणी आग लागली होती त्याच्यात लगत दोन्ही बाजूंनी भर गच्च वस्ती आहे तसेच नवीन पोलीस स्टेशनची इमारत उद्घाटनाच्या प्रतीक्षेत सुद्धा आहे त्यामुळे नागरिकांमध्ये अशा उलट सुलट चर्चा होत आहे की टँकर पुर्णे ला जात होते तर सिंगणापूर कडे कसं काय तसेच प्रश्नही उभा करीत आहेत की या टँकरच्या चारीही रकान्यांमध्ये जर आग लागून भीषण स्फोट झाला असता तर याला जबाबदार कोण ? असा ही प्रश्न उपस्थित होत असून पुर्णा जंक्शन रेल्वे स्थानकावरील डिझेल डेपोतील डिझेल चोरी प्रकरण अद्याप तरी थांबले की नाही ? असा प्रश्न उपस्थित होतांना या घटनेवरून दिसत आहे......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या