🌟महावितरण कंपनी मध्ये कायम कामगार व कंत्राटी कामगारांमध्ये दुजाभाव......!


🌟कंत्राटी कामगार  गुणवंत पुरस्कारापासून वंचित : तांत्रिक अप्रेंटिस कंत्राटी कामगार असोसिएशनची पुरस्कार देण्याची मागणी🌟

बेलोना :-महावितरण कंपनीतील कंत्राटी कामगार हा थकबाकी वसुली, देखभाल, दुरुस्ती चे कामे करून ग्राहकांना दर्जेदार सेवा देण्याचा प्रयत्न करीत आहे व विज गळती कमी करण्यासाठी सुध्दा सातत्याने कंत्राटी कामगारांचे प्रयत्न असतात .कोवीड काळामध्ये विशेष कार्य केले त्याच्या कार्याची शासन व प्रशासनाने दखल घेवून अनेक वेळा कार्याचा गौरव केला आहे. शेकडो कंत्राटी कामगारांनि कोवीड काळामध्ये व सेवा बजावत असताना प्राणाची आहुती दिली आहे. अशा कार्य कर्तृत्ववान कंत्राटी कामगारांची 1 मे महाराष्ट्र व कामगार दिनी गुणवंत कामगार पुरस्कार देऊन गौरवण्यात यावे अशी मागणी तांत्रिक अप्रेंटिस कंत्राटी कामगार असोसिएशन ने केली होती त्या मागणीचा विचार न केल्यामुळे कंत्राटी कामगारांमध्ये प्रचंड प्रमाणात अस्वस्थता निर्माण झाली असल्याची माहिती तांत्रिक अप्रेंटिस कंत्राटी कामगार असोसिएशनचे विक्की कावळे यांनी प्रसिद्ध केलेल्या पत्रकात दिली आहे. १ मे कामगार दिनानिमित्त कायम कामगारांना विभागीय स्तरावरील विशेष कामाची दखल घेवुन गुणवंत कामगार पुरस्काराने सन्मानित करण्यात येते त्याच धर्तीवर कंत्राटी कामगारांना सुद्धा गुणवंत कामगार पुरस्काराने सन्मानित करण्यात करून त्यांचा गौरव करण्यात यावा अशी मागणी महावितरण व्यवस्थापकीय संचालक यांना निवेदनाद्वारे तांत्रिक ॲप्रेटीस , कंत्राटी कामगार असोसिएशन ने केली होती. त्यानुसार महावितरण ने निर्णय घेऊन कंत्राटी कामगारांच्या कार्याचा गौरव करावा व वाढलेला असंतोष कमी करावा अशी मागणी तांत्रिक अप्रेंटिस कंत्राटी  कामगार असोसिएशनचे विक्की कावळे यांनी केली आहे......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या