🌟परभणी येथे मानव मुक्ती मिशनचे एकदिवसीय प्रशिक्षण शिबिर संपन्न....!


🌟प्रशिक्षणात विविध जातीधर्माच्या महिला व पुरूषांची आवर्जून उपस्थीती🌟

परभणी : मानव मुक्ती मिशन परभणीच्या वतीने सारनाथ कॉलनी परभणी येथे दि 11.5.2024 रोजी शनिवारी सकाळी 10.30 ते 5.30 वाजेपर्यंत दिवसभर प्रशिक्षण शिबीर घेण्यात आले.प्रशिक्षक मानव मुक्ती मिशनचे संस्थापक अध्यक्ष मा.नितीन सावंत (हभप. धर्मकीर्ती महाराज) हे होते.त्यांनी प्राचीन भारताचा इतिहास ते सद्य परिस्थीती बाबत अतिशय चांगल्या रितीने उपस्थीत प्रशिक्षणार्थीना मार्गदर्शन केले प्रशिक्षणात विविध जातीधर्माच्या महिला व पुरूष उपस्थीत होते. 

 शिबीराचे अध्यक्षस्थानी सारनाथ सहकारी गृहनिर्माण संस्थेचे अध्यक्ष तथा सेवानिवृत्त तहसीलदार मा.एन जी खंदारे , सेवानिवृत्ततहसीलदार डी के ओव्हाळ तर उदघाटक म्हणून ह. भ.प.एकनाथ महाराज भालेराव,उद्योजक सखारामजी रणेर,मा.तुकारामाजी मगर सेलु, मा.बायजाबाई घोडे प्रदेशाध्यक्षा शाक्त शैव परीषद महाराष्ट्र,मा.विलास रणखांबे,शिवाजी बोबडे पुर्णा यांच्यासह परभणी जिल्ह्यासह मराठवाडय़ातून प्रतिनिधी उपस्थीत होते.

विलास रणखांबे यांचे वतीने दुपारचे वेळी प्रशिक्षणार्थीना स्वखर्चाने अल्पोपाहाराची व चहाची व्यवस्था करण्यात आली होती शेवटी प्रश्न उत्तराच्या तासाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या