🌟वाशिम जिल्हाधिकारी कार्यालयात महाराष्ट्र राज्याच्या ६४ व्या वर्धापन दिनानिमित्त ध्वजारोहण....!


🌟जिल्हाधिकारी श्रीमती बुवनेश्वरी एस यांच्या हस्ते राष्ट्रध्वजारोहण करण्यात आले🌟


फुलचंद भगत

वाशिम:-महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या ६४ व्या वर्धापन दिनानिमित्त आज १ मे रोजी जिल्हाधिकारी कार्यालय येथे जिल्हाधिकारी श्रीमती बुवनेश्वरी एस यांच्या हस्ते राष्ट्रध्वजारोहण करण्यात आले. ध्वजारोहणानंतर राष्ट्रगीत व राज्यगीत झाले. यावेळी पोलीस पथकाने राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली.  


यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी विश्वनाथ घुगे, उपजिल्हाधिकारी मोहन व्यवहारे, तहसिलदार निलेश पळसकर,जिल्हा सुचना व विज्ञान अधिकारी सागर हवालदार, विधी अधिकारी महेश महामुने, सहाय्यक अधीक्षक सुनील घोडे, अनिल घोडे यांची प्रमुख उपस्थिती होती शहीद जवानांच्या विरपत्नी व माता-पिता , स्वातंत्र्य सैनिकांचे नातेवाईक, विविध कार्यालयाचे कार्यालय प्रमुख व कर्मचारी यावेळी उपस्थित होते.कार्यक्रमाचे संचालन मोहन शिरसाठ यांनी केले.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या