🌟नांदेड तालुक्यातील वांगी येथील प्रबुध्द विहारात उद्या शुक्रवार दि.३१ मे रोजी बुध्दमुर्ती स्थापनेचा कार्यक्रम......!


🌟या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रिपब्लीकन सेनेचे मराठवाडा अध्यक्ष माधव जमदाडे हे राहणार🌟 

नांदेड - तथागत भगवान गौतम बुध्द यांच्या २५६८ व्या जयंतीचे औचित्य साधून नांदेड तालुक्यातील वांगी येथील प्रबुद्ध विहारात शुक्रवार दि.३१ मे बुध्दमुर्ती स्थापनेचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.तथागत गौतम बुद्ध यांच्या २५६८ व्या जयंतीनिमित्त मिती चैत्र वैशाख पौर्णिमा १९४६, बुद्धाब्ध २५६८ दि. ३१ मे रोजी शुक्रवारी सकाळी ठिक ९.३० वाजता बुध्द मुर्ती स्थापना कार्यक्रम अतिशय उत्साहात पार पडणार आहे.

 प्रबुध्द विहार समितीच्यावतीने आयोजित या कार्यक्रमाच्या प्रारंभी शुक्रवारी सकाळी ९.३० वाजता वांगी ग्रामपंचायतीचे सरपंच गोविंदराव जाधव यांच्या हस्ते पंचशिल ध्वजारोहण होणार आहे तर जिल्हा भिखु संघाचे अध्यक्ष भदंत पय्याबोधी महायेगे आणि वाजेगाव येथील पु.भदंत संघपाल यांच्या प्रमुख उपस्थितीत सकाळी ठिक ११.३०  प्रबुध्द विहाराचा उ‌द्घाटन सोहळा आणि धम्मपोदेश कार्यक्रम पार पडणार आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रिपब्लीकन सेनेचे मराठवाडा अध्यक्ष माधव जमदाडे हे राहणार असून याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून नांदेड दक्षिणचे आ.मोहनअण्णा हबंडे , वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष राजेश्वर पालीमकर, वांगीचे माजी सरपंच तथा तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष गोविंदराव दत्तराम जाधव, शालेय शिक्षण व्यवस्थापन समितीचे सदस्य विनायक कोंडीबा जाधव, इंजिनिअर भारतकुमार कानिंदे,  बसपाचे जिल्हाध्यक्ष सुभाष भोकरे, माजी जि.प. सदस्य मनोहरराव शिंदे (धनेगाव ),माजी उपसरपंच नागोराव तुळशीराम जाधव, सामाजिक कार्यकर्ते दत्तराम चांदोजी जाधव,समता सैनिक दलाचे 

रविकिरण भानुदास जोंधळे,  इंजिनिअर सिद्धार्थ पाटील, माजी नगरसेवक तथा पि.आर.पी. कवाडे गटाचे राज्य उपाध्यक्ष बापुराव गजभारे ( नांदेड ) , इंजिनिअर अॅड. माधव मनोहर हट्कर, डॉ.कपील मनोहर हट्कर, इंजिनियर  प्रशांत इंगोले, अशोक दातार सुभेदार, बसपाचे मुदखेड तालुकाध्यक्ष रत्नाकर तारु , माजी सरपंच तथा ग्रामपंचायत सदस्य प‌द्माकर नारायण तारु , डॉ. सिद्धार्थ भेदे, बौद्धाचार्य व्यंकटराव गजभारे , उद्धव ढाकणीकर आदि मान्यवर उपस्थित राहणार आहेत. यावेळी भोजन व खिरदान कार्यक्रम देखील होणार आहे.

तसेच रात्री ८ वाजता सविता गणेश गोदाम ( नांदेडकर ) आणि संच यांचा बुध्द-भिम गित गायनाचा सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहे. तरी वरील सर्व कार्यक्रमास शहरासह जिल्ह्यातील बौध्द अनुयायांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन आयोजक प्रबुध्द विहार संयोजन समितीचे दयानंद मनोहर तारु, सिद्धार्थ पुंडलिक तारु आणि भास्कर किशन तारु आदींनी एका प्रसिध्दी पत्रकाद्वारे केले आहे.......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या