🌟माती परीक्षण काळाची गरज - डॉ.उदय खोडके


🌟परभणी तालुक्यातील पेडगाव येथे 'माझा एक दिवस माझ्या बळीराजा सोबत' हा कार्यक्रम संपन्न🌟 


परभणी :  माझा एक दिवस माझ्या बळीराजा सोबत,या कार्यक्रमाअंतर्गत दि.09 मे 2024 रोजी परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डाॅ.ईंद्रमणी, ङाॅ.डि.एन.गोखले यांच्या मार्गदर्शनाखाली एक दिवस माझ्या बळीराजासोबत हा कार्यक्रम पेडगाव येथे प्रगतशील शेतकरी विजय जंगले यांच्या शेतात पार पडला कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहिलेले डॉ. उदय खोडके संचालक शिक्षण तथा अधिष्ठाता कृषी, डॉ.सय्यद इस्माईल सहयोगी अधिष्ठाता व प्राचार्य कृषी महाविद्यालय परभणी, डॉ.वासुदेव नारखेडे प्रभारी अधिकारी कोरडवाहू शेती संशोधन प्रकल्प डॉ.राजेश कदम विभाग प्रमुख कृषी विस्तार शिक्षण विभाग, डॉ.प्रवीण वैद्य विभाग प्रमुख मृदशास्त्र  विभाग, डॉ.आनंद गोरे वरिष्ठ शास्त्रज्ञ कोरडवाहू शेती संशोधन प्रकल्प, डॉ.जी.एम.कोटे कृषी विद्यावित्ता, डॉ.पी.एच. गोरखेडे मृदशास्त्र, स्वाती राजेंद्र घोडके सहाय्यक तंत्रज्ञान व्यवस्थापक आत्मा, परभणी या सर्वांच्या उपस्थितीमध्ये एक दिवस माझ्या बळीराजासोबत हा कार्यक्रम पेडगाव येथे विजय जंगले प्रगतशील शेतकरी यांच्या शेतात राबवण्यात आला यामध्ये शेतकरी आणि शास्त्रज्ञ यांच्यामध्ये दिवसभर चर्चा झाली, शेतकऱ्यांचे प्रश्न अडचणी जाणून घेऊन त्यांच्या प्रश्नाचे निरसन केलं गेलं, तसंच सर्व शेतीविषयक अडचणी जाणून घेऊन योग्य मार्गदर्शन करण्यात आलं फळबाग, जमिनीची सुपीकता,कुठल्या फळासाठी कुठली जमीन योग्य आहे यावरही चर्चा झाली शेतकऱ्यांचाही भरभरून प्रतिसाद मिळाला,तसेच मार्केटिंग कापूस सोयाबीनचे उत्पन्न कसे वाढवता येईल, या विषयांवर ही मान्यवरांनी सखोल मार्गदर्शन केले, तसेच प्रकल्प संचालक आत्मा परभणी,दौलत चव्हाण जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी परभणी,अनिल गवळी आणि तालुका कृषी अधिकारी परभणी, नित्यानंद काळे यांच्या मार्गदर्शनाखाली, स्वाती घोडके यांनी सोयाबीन उगवण क्षमता प्रात्यक्षिक, तसेच बीज प्रक्रिया प्रात्यक्षिक, निंबोळी अर्क याविषयी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले, कार्यक्रमाची प्रस्तावना डॉ.आनंद गोरे यांनी केले, सूत्रसंचालन  स्वाती घोडके यांनी केले तर आभार प्रदर्शन विजय जंगले यांनी केले अशाप्रकारे एक दिवस माझ्या बळीराजासोबत हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडला......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या