🌟पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या जयंती निमित्त : प्रहार जनशक्ती पक्षाचे रक्तदान शिबिर संपन्न....!


🌟या रक्तदान शिबिरात ३७ रक्तदात्यांनी रक्तदान केले🌟

परभणी - प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष मा.आ. बच्चुभाऊ कडू यांच्या संकल्पनेतून आणि पुढाकाराने संपूर्ण महाराष्ट्रामध्ये निर्माण झालेला रक्ताचा तुटवडा लक्षात घेता पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या जयंती निमित्त म्हणजेच ३१ मे २०२४ रोजी राज्यव्यापी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

याच अभियानाचा एक भाग म्हणून आज पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या जयंतीनिमित्त आज दि.३१ मे २०२४ रोजी परभणी येथे प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने जिल्हा शासकीय रुग्णालयातील शासकीय रक्तपेढी च्या सभागृहात तालुका स्तरीय रक्तदान शिबिराचे आयोजन सकाळी ८.०० ते दुपारी ११ या दरम्यान करण्यात आले होते. या शिबिरात रक्तदात्यांनी भरभरून प्रतिसाद दिला.

जिल्ह्यामध्ये निर्माण झालेला रक्ताचा तुटवडा आणि थॅलेसेमिया रोगाने ग्रस्त असलेल्या रुग्णांना रक्ताची असलेली गरज विचारात घेता या  तुटवड्याच्या काळात प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने घेण्यात आलेल्या रक्तदान शिबिरांमुळे गरजवंत रुग्णांना नक्कीच याचा फायदा होणार आहे. या रक्तदान शिबिरात ३७ रक्तदात्यांनी रक्तदान केले.

यावेळी प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हाप्रमुख शिवलिंग बोधने, उपजिल्हाप्रमुख रामेश्वर जाधव, तालुकाप्रमुख उद्धव गरुड, शहर प्रमुख अंकुश गिरी, शहर चिटणीस वैभव संघई, रामेश्वर पुरी, बाळा नरवाडे इत्यादी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या