🌟परभणी जिल्ह्यातील जिंतूर येथे हॉटेल चालकाच्या मारहाणीत महाराष्ट्र सेक्युरिटी फोर्सच्या जवानाचा दुर्दैवी मृत्यू....!


🌟किरकोळ कारणावरून झालेल्या जबर मारहाणीत झाला सुरक्षा जवान अजगर खाजा शेख यांचा मृत्यू🌟 


परभणी : परभणी जिल्ह्यातील जिंतूर येथील शिवाजी चौकात असलेल्या सपना हॉटेलमध्ये शुक्रवार दि.०३ मे २०२४ रोजी सकाळच्या सुमारास किरकोळ कारणावरून झालेल्या जबर मारहाणीत महाराष्ट्र सेक्युरिटी फोर्सच्या जवानाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली.

 या दुर्दैवी घटना मृत्यू झालेले महाराष्ट्र सेक्युरिटी फोर्सचे जवान अजगर खाजा शेख वय ३३ वर्ष हे जिंतूर तालुक्यातील येळीकेळी येथील रहिवाशी असून ते शुक्रवारी सपना हॉटेलमध्ये नाष्टा करण्यासाठी गेले होते. यावेळी हॉटेल मालक शेषराव लक्ष्मण आव्हाड,अमोल शेषराव आव्हाड,हॉटेलवर काम करणारा बालाजी पांडुरंग रणखांबे व इमरान कुरेशी यांनी लवकर नाष्टा का मागतो, घाई का करतोय, हॉटेल का तुझ्या बापाची आहे का,आम्हाला वेळ मिळेल तेव्हा आम्ही नाष्टा देवू असे म्हणत बेदम मारहाण केली. या मारहाणीत अजगर शेख यांचा मृत्यू झाला.

            दरम्यान, या प्रकरणाती आरोपींविरुध्द जिंतूर पोलिस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या