🌟नांदेड येथील प्रभात नगरातील भैय्यासाहेब आंबेडकर विहारात माता रमाई आंबेडकर यांना अभिवादन....!


🌟यावेळी असंख्य बौद्ध उपासक उपासिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती🌟


 
नांदेड :- माता रमाई आंबेडकर यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना जीवनातील प्रत्येक संघर्षात समर्थपणे साथ दिली.डॉ.बाबासाहेबांच्या सामाजिक उत्थानाच्या कार्यात त्यांनी स्वतःला समर्पित केले त्याग आणि संयमाच्या प्रतीक असलेल्या माता रमाई आंबेडकर यांना स्मृतिदिनानिमित्त नांदेड येथील प्रभात नगरातील भैय्यासाहेब आंबेडकर विहारात काल सोमवार दि.27 मे 2024 रोजी सायंकाळी 7.00 वाजता माता रमाई आंबेडकर यांना विनम्र अभिवादन करण्यासाठी सभा आयोजित करण्यात आली होती यावेळी प्रभात नगर,कुशी नगर,लुंबिनी नगर येथील सर्व बौध्द उपासक उपासीका बालक बालिका नवयुवक भीमसैनिक उपस्थित होते  त्या वेळी उपस्थित ज्येष्ठ महिला भारतीबाई सदावर्ते,आठवले माय,गोले माय,वाटोरे माय,डोईबळे माय,सोनसळे बाई,ढगे बाई,आठवले मावशी,रमेश ढगे,संदीप वाटोरे,अजय थोरात,संबोधित कांबळे,राहुल गायकवाड,विशाल धायजे,सोनू पुंगडे,दास निखाते,पेरू,आदी मान्यवर उपस्थित होते

माता रमाई आंबेडकर अभिवादन सभेचे आयोजन धम्माश्रय युवा विचार मंच नांदेड,प्रभात नगर मित्र परिवार नांदेड आदींच्या वतीने करण्यात आले होते....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या