🌟रेशीम शेती शेतकऱ्यांसाठी वरदान - शाखाधिकारी गोपाल काटोले


🌟श्री.शिवछत्रपती सुशिक्षित बेरोजगार सेवा सहकारी संस्था संचलित रेशीम धागा निर्मिती केंद्रास शाखाधिकारी वाटोळे यांची भेट🌟


पुर्णा (दि.१५ मे २०२४) - पुर्णा येथील श्री.शिवछत्रपती सुशिक्षित बेरोजगार सेवा सहकारी संस्था मर्यादित पूर्णा द्वारा संचलित रेशीम धागा निर्मिती केंद्रात आज बुधवार दि.१५ मे २०२४ रोजी भारतीय स्टेट बँकेचे शाखा व्यवस्थापक गोपाल काटोळे,कृषी ऋण अधिकारी,अभिषेक पाटील व समर्थ कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक डॉ सिद्धांत संजय लोलगे व बँक कर्मचारी शेख  हमीद भाई यांनी रेशम धागा निर्मिती केंद्रास भेट दिली रेशीम कोषापासून धागा निर्मितीची प्रक्रिया प्रात्यक्षिक पाहिले तू तिच्या कशापासून धागा निर्मित होत असलेल्या धाग्यास व धाग्याचा इतर प्रकार तसेच झूट झिल्ली कच्चा धागा ते पक्का धागा संपूर्ण प्रक्रिया  प्रत्यक्षरीत्या पाहिली यावेळेस कार्यक्रमास उपस्थित असलेल्या शेतकऱ्यांना त्यांनी मार्गदर्शन केले.


शेतकऱ्यांनी तुती शेती करावी तुती शेती शेतकऱ्यांसाठी वरदान आहे शेतीतून योग्य आर्थिक मोबदला मिळतो शेतकऱ्याचे राहणीमान उंचावेल  रेशीम शेती एक उत्कृष्ट जोड धांद्यांपैकी आहे भारतीय स्टेट बँक सुद्धा रेशीम शेती करणाऱ्या शेतकऱ्यांच्या पाठीशी भक्कम पणे उभी आहे. व्यापक स्वरूपात तुती शेती शेतकऱ्यांनी पीक म्हणून करावी असे आव्हान त्यांनी  कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संस्थेचे अध्यक्ष संचालक मंडळ व कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या