🌟जंग-ए-अजित न्युज - महत्वाच्या अपडेट / हेडलाईन्स / बातम्या.....!


🌟उद्धव ठाकरे व आदित्य ठाकरे या पिता पुत्राला जेलमध्ये पाठवण्याची तयारी संजय राऊत करतायत : एकनाथ शिंदे गटाचा आरोप/दावा 

 ✍️ मोहन चौकेकर

* लोकसभा निवडणूक 2024 मध्ये तिसऱ्या टप्प्यातील हाय व्होल्टेज लढतींसाठी सायंकाळी 5 वाजेपर्यंत 53.40 टक्के मतदान; कोल्हापूर, हातकणंगले आघाडीवर तर बारामतीत सर्वात कमी मतदान 

* ईव्हीएम हॅक करण्यासाठी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते असलेले ठाकरे गटाचे नेते  अंबादास दानवे यांच्याकडे अडीच कोटींची मागणी, पुण्यातील हॉटेलमधून आरोपी मारुती ढाकणेला अटक ; मतदाराने EVM पेटवलं, माढा मतदारसंघातील सांगोल्यातील घटना, तरुण पोलिसांच्या ताब्यात ; मतदान करायला गेले अन् यादीतून नावच गायब, अनेकजण मतदानापासून वंचित; लातूरमधील धक्कादायक प्रकार

* अजित पवारांच्या बूथ सदस्याकडून मतदारांना दमदाटी; शरद पवार गटाची तक्रार, तर रोहित पवारांकडून थेट पैसे वाटपाचा व्हिडीओ शेअर ; पराभव समोर दिसत असल्याने असे खोटे आरोप, रोहित पवारांच्या दाव्याला मंत्री शंभुराज देसाईंचं उत्तर 

* माझ्याशिवाय कोणीच नाही, बारामती अॅग्रोचं कुणी येणार नाही"; आमदार दत्तात्रय भरणेंचा शिवीगाळचा VIDEO रोहित पवारांकडून ट्वीट ; दत्तात्रय भरणेंनी शिवीगाळ केली, भेटीला आलेल्या सुप्रिया सुळेंना आपबिती सांगताना नाना गवळी ढसाढसा रडले ; मी मराठीत बोललो, शिवीगाळ केलेली नाही, तक्रारीला कायदेशीर पद्धतीनं उत्तर देऊ; व्हायरल व्हिडीओनंतर दत्तात्रय भरणेंनी थेट सांगितलं ; सुप्रिया सुळे आलेल्या माहिती नाही आणि भेटल्याही नाहीत, कुणी भेटलं म्हणून बारामतीकर मत देत नसतो, अजित पवारांची प्रतिक्रिया                                                     

* काँग्रेस कसाबची बाजू घेतंय, हा शहिदांचा अपमान; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा वडेट्टीवारांवर जोरदार हल्लाबोल ; 'चार जूनला इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट फिक्स', अहमदनगरमधून पंतप्रधान नरेंद्र मोदींचा प्रहार ; नरेंद्र  मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान झाले की, अहमदनगरचं नाव अहिल्यानगर होणारच; देवेंद्र फडणवीसांचं आश्वासन 

* मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं टेन्शन संपलं! शिवसेना उमेदवार नरेश म्हस्केंना भाजपाचे नेते गणेश नाईकांचा आशीर्वाद ; दक्षिण मुंबई विजयासाठी शिंदे गटाच्या उमेदवार यामिनी जाधवांची राज ठाकरेंना साद, 'शिवतीर्था'वर भेट 

* ठाणे आणि डोंबिवलीकरांसाठी खुशखबर! शिळफाट्याचा प्रवास आता सुस्साट होणार, शिळफाटा उड्डाणपूलाच्या आणखी तीन मार्गिका सेवेत 

* राज्यात पुढील 48 तासांत उष्णतेची लाट! मराठवाडा, विदर्भात अवकाळी पावसाचा अंदाज ; 7 मेपासून पावसाचा जोर वाढणार 

* अभिनेता सलमान खानच्या घरावरील गोळीबार प्रकरणी पाचवा आरोपी अटकेत; राजस्थानमधून मुसक्या आवळल्या ; सलमान खानच्या कोट्यवधींच्या संपत्तीचा वारस ठरल्याची चर्चा 

* एमएस धोनी फाटलेल्या स्नायूंनी खेळतोय,  डॉक्टरांकडून सक्तीच्या विश्रांतीचा सल्ला ;धोनीसह 10 खेळाडूंचा अखेरचा आयपीएल हंगाम, IPL 2024 नंतर 'हे' खेळाडू निवृत्ती घेणार 

* देशाचा मुड नेहमी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत राहिलेला आहे या वेळी देखील तो तसाच राहणार आहे -- दिपक केसरकर 

* महिला आयोगाच्या अध्यक्षा असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यां रुपाली चाणक्य यांनी चक्क EVM मशिनरी केली पुजा, रुपाली चाणक्य यांच्यावर गुन्हा दाखल 

* कुंटुबियांची साथ नाही या विरोधकांच्या टीकेवर अजित पवारांचे विरोधकांना चोख प्रत्युत्तर अजितदादा पवार म्हणाले मेरी माँ मेरे साथ है

* उद्धव ठाकरे व आदित्य ठाकरे या पिता पुत्राला जेलमध्ये पाठवण्याची तयारी संजय राऊत करतायत एकनाथ शिंदे गटाचा आरोप / दावा 

* मतदान करण्यासाठी चक्क लंडन वरुन येऊन अंकित पाटील यांनी बजावला मतदानाचा हक्क 

* बारामतीमध्ये मतदानाच्या दिवशी  सुप्रिया सुळे चक्क  अजित पवारांच्या घरी गेल्याने उडाली खळबळ 

* बाबा तुच वस्तरा घे आणि काढ मिशी ,  मिशी काढण्यावर उन अजित पवारांचा विरोधकांना टोला 

* मतदाराने चक्क EVM मशिन पेटवले, माढा मतदारसंघातील सांगोल्यातील घटना,तरुण पोलिसांच्या ताब्यात  

✍️ मोहन चौकेकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या