🌟रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचे पुर्णा रेल्वे डिझेल डेपोतील डिझेल घोटाळ्याला प्रोत्साहन तर नाही ना ? जनसामान्यांना पडला प्रश्न....!


🌟पर्णा डिझेल डेपोतील डिझेल घोटाळ्यासह रेल्वे मेकॅनिकल स्टोअररुम जळीत प्रकरणाचा तपासावर गुलदस्त्यात ?🌟


🌟रेल्वे स्टोअररुम जळीत प्रकरणी चौकशीच्या कचाट्यात अडकलेले मुख्य कर्मीदल अधिक्षक चेपुरी सुरेश यांच्याकडे पुन्हा कारभार🌟 नांदेड/पुर्णा (परखड सत्य - चौधरी दिनेश): दक्षिण मध्य रेल्वे नांदेड विभागातील अत्यंत महत्त्वाचे रेल्वे जंक्शन स्थानक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुर्णा रेल्वे स्थानकावरील रेल्वे डिझेल डेपोत मागील अनेक वर्षांपासून कोट्यावधी रुपयांचा डिझेल घोटाळा अर्थात डिझेल चोरी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या संगनमतातून घडत असल्याची जोरदार चर्चा कर्मचारी वर्गातून ऐकावयास मिळत होती परंतु या विरोधात उघडपणे आवाज उठवण्यास कोणीही समोर येत नव्हते परंतु या रेल्वे डिझेल घोटाळ्यातील घोटाळेबाजांच्या पापांचा घडा दि.२९ जानेवारी २०२४ रोजी सिंगणापूर फाटा परिसरात फोडण्याचे काम परभणी जिल्हा स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केल्यानंतर रेल्वे डिझेल डेपोतील घोटाळेबाजांसह त्यांच्या पाठीराख्यांमध्ये देखील खळबळ माजली या प्रकरणात रेल्वे सुरक्षा यंत्रणांनी आठ जणांवर आरोपपत्र दाखल केले खरे परंतु या कोट्यावधी रुपयांच्या डिझेल घोटाळ्याचा तपास अगदी खोलवर करून यातील मोठ्या घोटाळेबाजांना काळकोठडी दाखवली जाईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती ती अपेक्षा मात्र फोल ठरली.


पुर्णा डिझेल डेपोतील डिझेल घोटाळ्यासह दि.२६ फेब्रुवारी २०२४ रोजी रेल्वे मेकॅनिकल स्टोअररुम जळीत प्रकरणी नांदेड दक्षिण मध्य रेल्वे विभागाच्या विभागीय व्यवस्थापक श्रीमती निती सरकार या गांभीर्याने लक्ष देऊन रेल्वे डिझेल चोरी प्रकरणात अडकलेल्या रेल्वे अधिकारी/कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करतील अशी देखील अपेक्षा व्यक्त केली जात होती परंतु या प्रकरणात आरोपपत्र दाखल झालेल्या सर्वच आरोपीतांसह रेल्वे मेकॅनिकल स्टोअर रूम जाळपोळ प्रकरणात संशयाच्या भोवऱ्यात अडकलेले व चौकशी सुरू असल्याने दि.०४ मार्च २०२४ रोजी मुख्य कर्मीदल अधिक्षक पदावरुन हटवलेले चेपुरी सुरेश यांना पुन्हा मुख्य कर्मीदल अधिक्षक पदावर सन्मानपूर्वक बसवून व डिझेल चोरी प्रकरणातील आरोपींवर निलंबनाची कारवाई न करता त्यांना पदोन्नती बहाल करुन दक्षिण रेल्वे नांदेड विभागातील अधिकाऱ्यांनी नांदेड विभागांतर्गत 'अंधेर नगरी चौपट राज' असा विचित्र कारभार चालत असल्याचे दाखवून दिले आरोपीत पुर्व सिसीसी चेपुरी सुरेश यांच्याकडे पुन्हा सिसीसी (मुख्य कर्मीदल अधिक्षक) पदाचा पदभार कसा व कोणाच्या आदेशानुसार दिला ? असा प्रश्न उपस्थित होत असून विभागीय व्यवस्थापक श्रीमती निती सरकार या गंभीर बाबीकडे लक्ष देऊन पुर्णा रेल्वे डिझेल डेपोतील डिझेल घोटाळ्याचा तपास सिबीआय किंवा प्रवर्तन निर्दशालयाकडे देतील काय असा ? असा प्रश्न देखील उपस्थित होत आहे.

पुर्णा डिझेल डेपोतील डिझेल चोरी प्रकरण दि.२९ जानेवारी २०२४ रोजी उघडकीस आल्यानंतर रेल्वे मेकॅनिकल स्टोअररुम जळीत प्रकरण घडण्याचा प्रकार योगायोग म्हणावा की रेल्वे डिझेल डेपो तील पुरावे नष्ट करण्यासाठी जाणीवपूर्वक घडवलेली जाळपोळ ? या प्रश्नाचा देखील उलगडा करण्याच्या दिशेने विभागीय व्यवस्थापक श्रीमती निती सरकार यांनी कठोर पावल उचलावी अशी मागणी समोर येत असून पुर्णा जंक्शन येथील रेल्वे कंज्युमर डिपोतील डिझेल चोरी प्रकरणातील रेल्वे सुरक्षा बलाच्या रेकॉर्डवरील मुख्य आरोपी आरसीडी मुख्य अधिक्षक माधव बलफेवाड,आरसीडी सहाय्यक अधिक्षक मोहम्मद इस्लाऊद्दीन उर्फ मोबीन,डि.कृष्णा आरसीडी चिफ लोको इन्स्पेक्टर, कांचन कुमार चिफ इन्चार्ज,चौकशीच्या कचाट्यात अडकलेले वरिष्ठ सहाय्यक डिव्हीजनल मेकॅनिकल इंजिनिअर विनोद साठे नांदेड यांच्यावर दक्षिण मध्य रेल्वे नांदेड विभागीय प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी जाणीवपूर्वक टाळाटाळ करुन या डिझेल घोटाळ्यावर पडदा टाकण्याचा प्रयत्न का करीत असावे ? असा देखील प्रश्न उपस्थित होत असून वरिष्ठ अधिकाऱ्यांनी वेळीच या गंभीर प्रकरणाचा सखोल तपास केला नाही आणि सिबीआय किंवा प्रवर्तन निर्दशालय‌याकडे तपास वर्ग केला नाही तर याविरोधात लवकरच मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात रिटपिटीशन दाखल होण्याची शक्यता नाकारता येत नाही.....


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या