🌟नांदेड येथे श्री स्वामी समर्थ पुण्यतिथी सप्ताहाची सांगता....!


🌟श्री स्वामी समर्थ मंदिर कला मंदिर व दिंडोरी प्रणित श्री स्वामी समर्थ अध्यात्मिक केंद्र मगनपुरा येथे सप्ताहाचे आयोजन🌟 

नांदेड (दि.०६ मे २०२४) - श्री स्वामी समर्थ यांच्या 143 व्या पुण्यतिथी निमित्त आयोजित सप्ताहाची सांगता सोमवारी 6 एप्रिल रोजी झाली आहे. दरम्यान श्री स्वामी समर्थ मंदिर कला मंदिर आणि दिंडोरी प्रणित श्री स्वामी समर्थ अध्यात्मिक केंद्र मगनपुरा येथे विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन केले होते.

       श्री स्वामी समर्थ मंदिर आणि अन्नछत्र मंडळ यांच्यावतीने 29 एप्रिल ते सहा मे या कालावधीत भागवत सप्ताह आणि किर्तन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यानिमित्त दररोज महाप्रसादाचे आयोजनही करण्यात आले होते. प्रतिवर्षाप्रमाणे यावर्षी देखील श्री स्वामी समर्थ मंदिर आणि अन्नछत्र मंडळाच्या वतीने भव्य दिव्य किर्तन महोत्सव आणि भागवत सप्ताहाचे आयोजन केल्या जाते. कला मंदिर परिसरातील जंगमवाडी येथे यावेळी भागवत सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. या सप्ताहाच्या काळात दररोज हजारो भाविक भक्तांनी भागवत कथेचे श्रवण केले आहे.

तर दिंडोरी प्रणित श्री स्वामी समर्थ अध्यात्मिक केंद्र मगनपुरा येथे सप्ताहाच्या काळात दुर्गा सप्तशती, स्वामी चरित्र, मल्हार सप्तशती, गुरुचरित्र, भागवत आणि नवनाथ पारायण जमलं का मनोज कर दीपा दिगंबरराव करण्यात आले तसेच अखंड प्रहर सेवा करण्यात आली आहे. दरम्यानच्या काळात गणेश याग, स्वामी याग, चंडीयाग, रुद्र याग, गीताई याग आधी यागाचे आयोजन करण्यात आले होते. स्वामी चरित्र आणि विविध पाठात महिलांची संख्या लक्षणीय होती हे विशेष.

29 एप्रिल ते 6 मे दरम्यान झालेल्या या सप्ताहाची सांगता सोमवारी झाली आहे. या काळात सर्वत्र भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या