🌟पुर्णा शहरासह तालुक्यातील ग्रामीण भागात दुचाकी वाहन चोरट्यांचा धुमाकूळ...!


🌟चोरट्यांनी वळवला मोर्चा ग्रामीण भागाकडे : गौर येथून मध्यरात्री पळवली 'स्प्लेंडर प्लस' मोटरसायकल🌟


पुर्णा (दि.१४ मे २०२४) - पुर्णा शहरासह तालुक्यातील ग्रामीण भागात अज्ञात वाहन चोरट्यांनी अक्षरशः धुमाकूळ घातल्याचे निदर्शनास येत असून दुचाकी/चारचाकी तसेच जड वाहन चोरीच्या घटना देखील घडत असल्यामुळे वाहनधारकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले असून पुर्णा शहरात मागील मागील वर्षभरात अनेक दुचाकी मोटरसायकली चोरी गेल्या परंतु कुठल्याही वाहन चोरीचा अद्याप पर्यंत तपास लागलेला नाही आतातर वाहन चोरट्यांनी आपला मोर्चा ग्रामीण भागाकडे वळवल्याचे निदर्शनास येत असून आज मंगळवार दि.१४ मे २०२४ रोजी मध्यरात्री ०१.३० वाजेच्या सुमारास तालुक्यातील गौर येथील शिवानंद रघुनाथ पटले यांची 'स्प्लेंडर प्लस' मोटरसायकल क्र.एम.एच.२२ एव्ही ००६८ ही दुचाकी अज्ञात वाहन चोरट्यांनी पळवली तर विलास जोगदंड यांची फॅशन-प्रो मोटारसायकल क्र.एम.एच.२६ बीए २१८९ ही दुचाकी पळवण्याचा अयशस्वी प्रयत्न चोरट्यांनी केला परंतु सदरील मोटरसायकल साखळदंडाने बांधलेली असल्याने चोरट्यांचा प्रयत्न अयशस्वी ठरला दरम्यान या घटनेमुळे गौर गावातील वाहनधारकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या