🌟पुर्णा तालुक्यात शेतकरी आत्महत्यांचे सत्र : गौर येथील शेतकऱ्याने उंदराचे औषध खावून केली आत्महत्या....!


🌟शेतीतील सततची नापिकी व बॅंकेच्या कर्जाला कंटाळून केली आत्महत्या🌟 

पुर्णा (दि.३१ मे २०२४) - पुर्णा तालुक्यातील गौर येथील शेतकरी शिवाजी पांडुरंग पारवे वय ५६ वर्ष यांनी शेतीतील सततच्या नापिकीमुळे बॅंकेचे कर्ज फिटता फिटत नसल्याने या कर्जाला कंटाळून उंदराचे औषध खावून आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली आहे .

          चुडावा पोलीस ठाण्याकडुन मिळालेल्या माहीतीनुसार शेतकरी शिवाजी पांडुरंग पारवे यांच्याकडे एस बी आय पूर्णा शाखेचे एक लाख दहा हजार कर्ज ,जिल्हा मध्यवर्ती बॅंक , महाराष्ट्र ग्रामीण बॅंक , खाजगी फायनान्स चे कर्ज , शेतातील नापिकी कर्ज कसे फेडावे याच तनावातुन गावाजवळील आखाड्यावर उंदराचे औषध खावून आत्महत्या केली .त्यांच्या पच्यात पत्नी ,तीन मुली , एक मुलगा असा परीवार आहे .नरहरी पारवे यांचे मोठे भाऊ होत .चुडावा ठाण्याचे  सहाय्यक पो  निरीक्षक नरसिंग पोमनाळकर यांनी माहीती दिली....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या