🌟व्यंगचित्रे ‘विनोदा’ बरोबर संदेश देतात - साहित्यिक डॉ.आसाराम लोमटे


🌟परभणीत व्यंगचित्रकार विनोद गोंगे यांच्या व्यंगचित्रांचे प्रदर्शन🌟

परभणी (दि.०६ मे २०२४) : कलावंत होणे हा व्यक्तीचा गुणधर्म आहे, एरव्ही मानव इसम असतो. व्यंगचित्रकार विनोद गोंगे ‘विनोदा’बरोबर चित्रांच्या माध्यमातून समाजाला योग्य संदेश देतात, असे मत साहित्यिक डॉ. आसाराम लोमटे यांनी व्यक्त केले.

               महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षण संघ, शाखा परभणी च्या वतीने जागतिक व्यंगचित्र दिनानिमित्त परभणीत व्यंगचित्रकार विनोद गोंगे यांच्या व्यंगचित्रांचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते. यावेळी लोमटे उद्घाटक म्हणून उपस्थित होते. याप्रसंगी मंचावर महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष तथा कार्यक्रमाचे अध्यक्ष किशन इदगे, संघाचे नेते मधुकर कदम, गोंगे यांच्या मातोश्री कनकमाला बाई गोंगे, सौ. मीनाक्षी गोंगे आणि ऋतुजा गोंगे आदींची उपस्थिती होती.

               कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना अरुण चव्हाळ यांनी सांगितले की, रेषा-रंग आणि शब्दांच्या माध्यमातून व्यंगचित्रकार चित्रांमध्ये आशय भरतो. समाजातील प्रत्येक घटकाला न्याय देण्यासाठी विनोद गोंगे यांनी शिक्षण, पर्यावरण, महिला आणि पुरुष, युवक -युवती, ज्येष्ठ नागरिक आणि सामाजिक माध्यमे आदी विषयांवर 450 दर्जेदार व्यंगचित्रांची निर्मिती केलेली आहे.विनोद गोंगे यांनी, जागतिक व्यंगचित्र दिनाच्या निमित्ताने समाजाला चांगल्या कलाकृती देता आल्या, याचा आनंद आणि समाधान आहे, अशा भावना व्यक्त केल्या.

             या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संदीप राऊलवार यांनी केले, तर उपस्थितांचे आभार पुरुषोत्तम पत्तेवार यांनी व्यक्त केले. यावेळी महाराष्ट्र राज्य शिक्षक संघाचे व्यंकटराव जाधव, सुधीर सोनुनकर, माणिक पुरी, गोकर्ण काळे, वहाब पठाण, धनंजय डोंगरे, अरविंद इंगळे, भारत शहाणे, निल पत्रे वार, मंगेश डोंबे, गजानन मिटकर आदींची उपस्थिती होती.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या