🌟पानकनेरगाव येथील गावची तहान भागवणारा तलाव अतिक्रमणच्या विळख्यात ?


🌟पानकनेरगाव हद्दीमध्ये एकमेव असलेल बेलदरी तलाव : या तलावाची तीस वर्षांपूर्वी १९८४ दरम्यान निर्मिती🌟 

✍🏻शिवशंकर निरगुडे (हिंगोली)

हिंगोली : बेलदरी तलावावर गावाच अस्तित्व:  पिण्याच्या पाण्याचा प्रश्न ऐरणीवर जल स्वराज्य व जलमिशनची विहीर तलावावर अवलंबून गावच भविष्य पाहता प्रशासन व लोकप्रतिनिधी लक्ष देण्याची गरज  तलावाच्या भोवतालची जमीन हडपण्याचा डाव तलावाचे सर्वेक्षण व मोजमाप करूण खोली व रूंदीकरणाची मागणी हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव पानकनेरगांव तलावाचा फायदा व्हावा यासाठी  प्रशासनाने लघू पाटबंधारे , सिंचन विभाग,लघूसिंचन विभाग जलसंधारण, जिल्हा परिषद,जलसंपदा, महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजना अश्या वेगवेगळ्या योजनेतून ग्रामीण भागामध्ये अनेक छोट्या मोठ्या तलावाची निर्मिती केली 

त्यातच पानकनेरगाव हद्दीमध्ये एकमेव असलेल बेलदरी तलाव आहे या तलावाची तीस वर्षांपूर्वी १९८४ दरम्यान निर्मिती झाली २० हेक्टर छेत्रफळ मध्ये महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत तलावाचे बांधकाम केले  या योजनेतून अनेक लोकांना  रोजगार सूद्धा मिळाला सदर या बेलदरी तलावामूळे पाणी पातळी वाढल्याने  परिसरातील अनेक शेतकऱ्याच्या विहिरीला फायदा झाला विषेश म्हणजे या तलावा बाजूला शंभर ते दीडशे मिटर गावाला पाणी पुरवठा करणारी करणारी जलस्वराज्य विहीर आहे. या विहीरीतून अंदाजे पंधरा हजार लोकसंख्या असलेल्या पानकनेरगावात पाणीपुरवठा केला जातो. गावाची तहान भागवली जाते व तसेच गावाला पाणीपुरवठा करण्यात यावा गावाची तहान भागवण्यासाठी नूकतीच गतवर्षी केंद्र शासनाची यांच्या जल मिशन योजनेची विहीर सुद्धा या तलावात घेण्यात आली त्यामुळे गावच भविष्य आता१००/ टक्के बेलदरी तलावावर अवलंबून आहे हे नाकारता येत नाही सदरील मात्र तलावाजवळ असलेल्या शेजारील ६ ते ७ गावाला पाझर नूसार फायदा होतो व तसेच एक दोन खेड्यांना पाणीपुरवठा सुद्धा केला जातो आणि पुरवठा करणाऱ्या विहीरीबरोबर तलावाचे तेवढेच महत्त्व सूद्धा आले आहे

असे असताना सदर मात्र गावची तहान भागवणारा तलाव अतिक्रमणाच्या विळख्यात अडकला आहे तलावाच्या आजूबाजूला राहणाऱ्या लोकांनी या तलावातच अतिक्रमण केले आहे काही लोकांनी तर थेट आता तलावाच्या भोवती नांगरणी करून शेती करण्याचा डाव सुद्धा आहे तर काहींनी तलावात विहीरी घेतल्याचा प्रताप केला या तलावाच्या भरोशावर गावच्या पिण्याच्या पाण्याचे भविष्य अवलंबून असलेल्या तलावाला गरगर लागली असून काही लोकांनी तलावावर कब्जा करण्याचा डाव आहे  पाण्याचा महत्‍वाचा स्‍त्रोत असणारे गाव तलाव आज मोठ्या प्रमाणात दुर्लक्षित आहेत. त्यामुळेच त्यांना अतिक्रमणाचा विळखा पडला आहे.सदर अश्या व्रूतीच्या लोकांमूळे  तलाव नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत या सरकारी तलावांचे सर्वेक्षण करून तलावांचा खोली व रूंदीकरण करावी अशी मागणी शेतकरी वर्ग करत आहे तलाव अतिक्रमणाच्या विळख्यात अडकलेचे दिसून येत आहेत. याकडे संबंधित विभागाने लक्ष देणे गरजेचे आहे. अतिक्रमण  करणाऱ्या मनोवृत्ती लोकांवर जल विभाग प्रशासनाने त्वरित  लोकांवर लवकर कारवाई करावी अशी मागणी ग्रामस्थांतून जोर धरू लागली आहे.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या