🌟पुर्णा रेल्वे डिझेल डेपोतील डिझेल चोरी प्रकरणात रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची भुमिका संशयास्पद ?


🌟डिझेल चोरी प्रकरणातील सात आरोपींना जामीन मंजूर : प्रकरणातील एकमेव आरोपी जामीनासाठी उच्च न्यायालयात🌟 

🌟मुख्य कार्यालयीन अधिक्षक मोहम्मद इस्लाऊद्दीन उर्फ मोबीन याच्या जामीनावर पुढील सुनावणी १३ जुन रोजी🌟


पुर्णा (विशेष वृत्त - मुक्काम पोस्ट पुर्णा जंक्शन) - पुर्णा जंक्शन रेल्वे स्थानकावरील रेल्वे डिझेल डिपोतील डिझेल चोरी प्रकरणाला २९ जानेवारी ते आज पावेतो १४ मे २०२४ पर्यंत जवळपास साडेतीन महिन्यांचा कालावधी उलटत असून सदरील प्रकरणावर दक्षिण मध्य रेल्वे प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी मौनव्रत धारण केल्याने या गंभीर प्रकरणातील आरोपींना जणूकाही एकप्रकारे पाठबळच मिळाल्याचे निदर्शनास येत असून या प्रकरणात रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी जाणीवपूर्वक फिर्याद देण्यासाठी टाळाटाळ केल्याने व असा काही प्रकार घडलाच नाही असा बनाव केल्याने या रेल्वे डिझेल चोरी प्रकरणात रेल्वे सुरक्षा बलाच्या अधिकाऱ्यांच्या फिर्यादीवरून गुन्हा नोंद करण्यात आला असून या प्रकरणातील जवळपास सात आरोपींना तपास यंत्रणांना सहकार्य करण्याच्या अटीवर न्यायालयाने जामीनावर सोडले असून या प्रकरणातील एकमेव आरोपी मुख्य कार्यालयीन अधिक्षक मोहम्मद इस्लाऊद्दीन उर्फ मोबीन याने अटकपूर्व जामीन मिळावा याकरिता माननीय जिल्हा सत्र न्यायालय औरंगाबाद यांच्याकडे अर्ज दाखल केला होता परंतु सन्माननीय न्यायालयाने दि.१४ फेब्रुवारी २०२४ रोजी आरोपी मोहम्मद इस्लाऊद्दीन उर्फ मोबीन याचा जामीन अर्ज फेटाळून लावल्यानंतर त्याने अटकपूर्व जामिनासाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात केस नंबर एबीए/००००२९१/२०२४ अंतर्गत अर्ज दाखल केला होता या अर्जावर पुढील सुनावणी १३ जुन २०२४ रोजी होणार आहे.

या घटने संदर्भात सविस्तर वृत्त असे की दक्षिण मध्य रेल्वे नांदेड विभागांतर्गत धावणाऱ्या जवळपास तिस ते पस्तीस प्रवासी एक्सप्रेस/पॅसेंजर रेल्वे गाड्यांसह मालवाहतूक करणाऱ्या अनेक रेल्वे गाड्यांच्या डिझेल इंजिनला इंधन पुरवठा पुर्णा जंक्शन रेल्वे स्थानकावरील डिझेल डेपोतून केला जात असे डिझेल डेपोसह फिलिंग पॉईंट पुर्णा स्थानकावर असल्यामुळे येथे टॅंकरद्वारे हजारो लिटर डिझेलचा पुरवठा होतो मात्र मागील अनेक वर्षांपासून या डिझेल डेपोतून मोठ्या प्रमाणात डिझेलचा काळाबाजार होत असल्याची चर्चा होत असतांनाच मागील साडेतीन महिन्यांपुर्वी दि.२९ जानेवारी २०२४ रोजी दुपारी १२-०० वाजेच्या सुमारास परभणी-गंगाखेड-ताडकळस राज्यमार्गावरील सिंगणापूर फाट्यालगत परभणी जिल्हा स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने रेल्वेला डिझेल पुरवठा करणारा टॅंकर क्रमांक एम.एच.२१ बीएच ३९४४ हा टॅंकर ड्रायव्हर संदिप आनंदराव पांढरे राहणार माळसिरस जिल्हा सोलापूर याच्यासह रंगेहाथ ताब्यात घेण्याची घटना घडल्यामुळे खळबळ माजली होती दरम्यान या रेल्वे डिझेल घोटाळ्या प्रकरणी परभणी लोकसभा मतदारसंघाचे लोकसभा सदस्य खा.संजय जाधव यांनी दि.०८ फेब्रुवारी २०२४ रोजी लोकसभेत शुन्य काळात प्रश्न उपस्थित करुन पुर्णा जंक्शन रेल्वे स्थानकावरील डिझेल डेपोत जवळपास ३०० कोटी रुपयांचा डिझेल घोटाळा झाल्याचे केंद्रीय रेल्वे मंत्रालयाच्या निदर्शनास आणून दिले त्यांनी लोकसभेत प्रश्न उपस्थित केल्यानंतर लोकसभा सचिवालयाने दि.१५ फेब्रुवारी २०२४ रोजी दक्षिण मध्य रेल्वे प्रशासनासह रेल्वे सुरक्षा यंत्रणांना १५ फेब्रुवारी २०२४ रोजी चौकशी आदेश जारी करुन तिस दिवसांत अहवाल सादर करण्याचे देखील आदेशात नमूद केले होते परंतु नंतर मात्र या चौकशी अहवालाचे काय झाले ते दक्षिण मध्य रेल्वे प्रशासनातील अधिकाऱ्यांनाच माहीत परंतु एवढे मात्र निश्चित की या रेल्वे डिझेल घोटाळ्यात अनेकांचे हात बरबटलेले आहेत.

पुर्णा जंक्शन रेल्वे स्थानकावरील डिझेल डेपोवर जवळपास आतापर्यंत कार्यरत अनेक अधिकारी पहाता पहाता कोट्यधीश झाल्याचे देखील बोलले जात असून या डिझेल घोटाळ्याची सीबीआय किंवा प्रवर्तन निर्दशालय‌‌‌ अर्थात डी मार्फत चौकशी झाल्यास हजारों कोटी रुपयांचा महाघोटाळा उघडकीस येण्याची शक्यता नाकारता येत नाही परंतु म्हणतात ना 'चोर चोर मौसेरे भाई...एक दुसरे को बचाने सभी जमात आगे आई' अशी अवस्था एकंदर झाल्याचे निदर्शनास येत असून या रेल्वे डिझेल चोरी प्रकरणातील आरोपींची हिंमत आता इतकी वाढली आहे की ते खुलेआम हमारा कोई बाल भी बिघाड नहीं सकता हमने सभी को खरीद लिया हैं असे म्हणून या प्रकरणा विरोधात परखड लिखाण करणाऱ्या प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींना आपल्या अलिशान चारचाकी वाहनांतून येवून धमकावतांना देखील पहावयास मिळत आहेत त्यामुळे या रेल्वे डिझेल महाघोटाळ्याची व्याप्ती मोठ्या प्रमाणात असल्याचा अंदाज व्यक्त होत आहे.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या