🌟वाशिम जिल्ह्यात अपघाताची मालिका सुरुच.......!


🌟मंगरुळपीर तालुक्यातील कोळंबी फाट्यावर दोन कारच्या अपघातात दोनजन जागीच ठार🌟

फुलचंद भगत

वाशिम:-मंगरूळपी तालुक्यातील कोळंबी फाटा येथे दोन कारचा अपघात होऊन दोन जण जागीच ठार झाल्याची घटना तारीख २ चे सायंकाळी सहा वाजता चे दरम्यान घडली आहे. या अपघातात दोन जण जागीच ठार झाले असून अन्य दोन जणांना अकोला येथे उपचारार्थ पाठवण्यात आले आहे.यापैकी एक जण गंभीर असल्याचे समजते.तर दुसऱ्या कारमधील चालकाला वाशीम येथे पाठवण्यात आल्याची माहिती मिळाली.वृत्तलिहेपर्यंत मृतक व जखमींची नावे समजली नव्हती.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या