🌟कर्मवीर भाऊराव पायगौंडा पाटील पुण्यस्मरण विशेष : अन्यायाची प्रचंड चीड असणारे....!


🌟कर्मवीर भाऊराव पाटील हे महाराष्ट्रातील एक सामाजिक कार्यकर्ते आणि शिक्षणतज्ज्ञ होते🌟

कर्मवीर भाऊराव पाटील यांनी आपले संपूर्ण आयुष्य शिक्षण प्रसारासाठी दिले. महाराष्ट्रातील एक प्रेरणादायी शिक्षणयात्री म्हणून ते ओळखले जातात. महाराष्ट्रातील जनतेने त्यांना कर्मवीर- कृतींचा राजा ही उपाधी देऊन सन्मानित केले. भारत सरकारने १९५९ मध्ये पद्मभूषण हा भारताचा तिसरा सर्वोच्च नागरी सन्मान देऊन आणि १९८८ मध्ये त्यांच्या सन्मानार्थ टपाल तिकीट प्रकाशित करून भाऊराव पाटील यांचा सन्मान केला.

          कर्मवीर भाऊराव पाटील हे महाराष्ट्रातील एक सामाजिक कार्यकर्ते आणि शिक्षणतज्ज्ञ होते. सामूहिक शिक्षणाचे पुरस्कर्ते असलेल्या भाऊरावांनी रयत शिक्षण संस्थेची स्थापना केली. कमवा आणि शिका या तत्त्वज्ञानाची सुरुवात करून त्यांनी मागास जाती आणि अल्प उत्पन्न असलेल्या लोकांना शिक्षित करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. ते महात्मा ज्योतिराव फुले यांनी स्थापन केलेल्या सत्यशोधक समाजाचे महत्त्वाचे सदस्य होते. भाऊराव पाटील हे जन्माने जैन होते. मात्र जनतेमध्ये ते इतके मिसळून गेले की संपूर्ण बहुजन समाजाला ते आपले वाटले. पाटील हे आडनाव (पद) भाऊरावांच्या घराण्याला पूर्वीपासूनच प्राप्त झाले होते. त्यांचे व्यक्तिमत्त्व जातीभेदाच्या पलीकडे होते. महात्मा फुले यांच्या सत्यशोधकी विचारांचा प्रभाव त्यांच्यावर होता. बहुजन समाजामध्ये शिक्षणाचा प्रसार करताना विद्यार्थ्यांमध्ये बंधुता व समता रुजावी यासाठी कर्मवीर भाऊराव पाटील यांनी शिक्षणातून समता व बंधुता याचे संस्कार विद्यार्थ्यांना देण्याचा प्रयत्न केला. रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमातून त्यांनी चालवलेल्या वसतिगृहात विविध जाती-धर्माचे विद्यार्थी एकत्र राहत असत, ते सर्वजण स्वतःच्या हाताने सामुदायिकरित्या स्वयंपाक करत आणि एकत्रच जेवण करत. एकदा कर्मवीर सुट्टीत इस्लामपूरला आले. त्यावेळी कार्मावीरांचे आई वडील तिथे राहत होते. रिकाम्या वेळेत कर्मवीर शाळेकडे गेले. पावसाळ्याचे दिवस होते. हवेत गारवा होता. सर्व मुले वर्गात बसलेली होती आणि एक मुलगा बाहेर कुडकुडत बसला होता. गुरुजीना विचारल्यानंतर तो इतर जातीचा असल्याने बाहेर बसवल्याचे कर्मवीरांना समजले. ते त्या मुलाला घरी घेऊन आले. घरात स्वतःजवळ बसूनच जेऊ घातले. नंतर कोल्हापूरला नेऊन मिस क्लार्क होस्टेलला दाखल केले. तो पुढे तो विधीमंडळाचा सभासद झाला. भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर यांनी चालवलेल्या मूकनायक वर्तमान पत्राचा तो काही काळ संपादक होता. इतर जातीचा हा मुलगा घरात आणल्याने कर्मवीरांच्या आईने त्यांना फुंकणीने मारले. फुंकणीचा मार वाया गेला नाही. पुढे कर्मवीरांच्या शैक्षणिक कामाला समतेची गोड फळे मिळाली. अण्णा हायस्कुला होते. पण त्यांन रस नव्हता.

           कर्मवीर भाऊराव यांचे पूर्ण नाव भाऊराव पायगौंडा पाटील असे होते. आईचे नाव गंगाबाई होते. त्यांचे मूळ गाव कर्नाटक राज्यात दक्षिण कन्नड जिल्यातील मूडब्रिदी हे होते. कर्मवीर यांचे पुर्वज नशीब अजमावण्यासाठी महाराष्ट्रात आले. पूर्वीचे त्यांचे आडनाव देसाई होते. पुढे ते ऐतवडे जि.सांगली येथे स्थिर झाले. पुढे त्यांच्या घराण्यात पाटीलकी आली त्यामुळे त्यांचे देसाई हे नाव जाऊन पाटील हे नाव रूढ झाले. कोल्हापूर जिल्यात हातकणंगले नावाचा तालुका आहे. या तालुक्यात बाहुबलीचा डोंगर आहे. या डोंगरावर पार्श्वनाथाचे सुंदर,भव्य स्मारक आहे. या डोंगराच्या कुशीत कुंभोज नावाचे छोटेशे गाव आहे. या गावी दि.२२ सप्टेंबर १८८७ रोजी, आश्विन शुद्ध पंचमी- ललिता पंचमीला कर्मवीरांचा जन्म झाला. त्यांचे बालपण कुंभोज या गावी गेले. भाऊरावांच्या आईला इतर जातीचीच नव्हे तर ब्राह्मणांची शिवाशिवही चालत नसे, एवढे हे कर्मठ घराणे होते. असे असले तरी भाऊराव लहानपणापासूनच बंडखोर होते. अन्यायाची त्यांना प्रचंड चीड होती. त्यांचे बालपण कुंभोजमधील अस्पृश्य मुलांबरोबर खेळण्यात गेले. अस्पृश्यतेबद्दल त्यांच्या मनात राग होता. अस्पृश्य समाजातील लोकांना पाणी दिले जात नाही म्हणून त्यांनी एका विहिरीचा रहाटच मोडून टाकला होता. त्यांचे प्राथमिक शिक्षण सांगली जिल्ह्यातील विटा आणि इतरही काही गावांत झाले. पुढील शिक्षणासाठी त्यांना कोल्हापूरच्या राजाराम हायस्कूलमध्ये दाखल करण्यात आले. त्यांची राहण्याची सोय जैन बोर्डिंगमध्ये करण्यात आली होती. याच काळात त्यांच्यावर राजर्षी शाहू महाराजांच्या विचारांचा व कार्याचा प्रभाव पडला. कर्मवीर लहानपणापासून बेडर वृत्तीचे होते. ते पट्टीचे पोहणारे होते. कर्मवीरांच्या गावी कुंभोजमध्ये सत्त्यापाचे बंड हे प्रकरण खूप गाजले होते. कुंपणाच्या काट्या तोडणाऱ्या एका दलित गरोदर बाईला एका माणसाने जनावरासारखे मारले. सत्त्याप्पा भोसलेला त्याचा सात्त्विक संताप आला. रागाच्या भरात त्याने त्या माणसाला ठार केले व तो फारारी झाला. तो कार्मावीर अण्णाच्या आजोबाच्या उसाच्या फडात लपून बसला. छोट्या भाऊरावाना तो अंगाखांद्यावर खेळवी. तो कर्मवीरांना पराक्रमाच्या गोष्टी सांगे. बंडखोरी, अन्यायाविरुद्ध चीड हे सदगुण सत्त्याप्पाकडून कर्मवीरांना मिळाले. त्यांच्या बालपणी सार्वजनिक ठिकाणी पाणी भरता येत नसे. इतरांकडून मागून पाणी घ्यावे लागे. पाण्यासाठी तास न् तास विनवणी करावी लागे. एकदा ते दृष्य पाहून अण्णाचे हृदय पिळवटून निघाले अन् मग कर्मवीरांनी रहाट मोडून आडात टाकला. कार्मावीरांचे प्राथमिक शिक्षण दहिवडी विटा या वडिलांच्या बदलीच्या गावी झाले. विटा या गावी दत्तोपंत जोशी यांनी चालवलेल्या खाजगी इंग्रजी वर्गात पहिलीचे इंग्रजीचे शिक्षण झाले. तेथे पुढील शिक्षणाची सोय नसल्याने कोल्हापूरला शिक्षणासाठी त्यांना जावे लागले. कोल्हापूरला असताना कोल्हापूर संस्थानचे राजे राजर्षी छत्रपती शाहू हे दलितांचे महाराज होते. तो भविष्यकाळाचा विचार करणारा राजा होता. त्यांनी महाराष्ट्रात समतेचा झेंडा लावला. सक्तीचे प्राथमिक शिक्षण सुरू केले. समाज प्रबोधनाच्या चळवळीमध्ये एक सुधारक म्हणून भाऊरावांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले. सन १९३२मध्ये महात्मा गांधी व विश्वरत्न विश्ववंद्य डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्यामध्ये पुणे करार झाला. या ऐक्याच्या स्मरणार्थ युनियन बोर्डींगची स्थापना भाऊरावांनी पुणे येथे केली. हे ऐक्य व्हावे या विषयीची तळमळ महर्षी शिंदे आणि भाऊराव पाटील यांना होती. पृथकतावादाने दलितांचे प्रश्न सुटणार नाहीत तर ते वाढतील असे त्यांचे मत होते. सन १९३५मध्ये महात्मा फुले अध्यापक विद्यालय त्यांनी सुरू केले. या मागे त्यांचा उद्देश शिक्षणाची गंगा- शैक्षणिक चळवळ ग्रामीण भागापर्यंत पोहोचवणे, त्यासाठी योग्य शिक्षक घडवणे हे होते. म्हणूनच त्यांचे भगीरथ प्रयत्न सुरू होते.        

           कर्मवीर भाऊराव पाटील यांनी आपले संपूर्ण आयुष्य शिक्षण प्रसारासाठी दिले. महाराष्ट्रातील एक प्रेरणादायी शिक्षणयात्री म्हणून ते ओळखले जातात. महाराष्ट्रातील जनतेने त्यांना कर्मवीर- कृतींचा राजा ही उपाधी देऊन सन्मानित केले. भारत सरकारने १९५९ मध्ये पद्मभूषण हा भारताचा तिसरा सर्वोच्च नागरी सन्मान दिला. काही दिवसांनी दि.९ मे १९५९ रोजी कर्मवीर अण्णांचे देहावसान झाले. नंतर भारत सरकारद्वारे सन १९८८मध्ये त्यांच्या सन्मानार्थ टपाल तिकीट प्रकाशित करून भाऊराव पाटील यांचा सन्मान केला.

!! स्मृतिदिनी कर्मवीर अण्णांना माझा दंडवत प्रणाम !!

                      - संकलन व सुलेखन -

                     श्री कृष्णकुमार आनंदी-गोविंदा निकोडे गुरूजी.

                     रामनगर वॉर्ड, गडचिरोली. जि.गडचिरोली.

                    फक्त व्हॉट्सॲप- 9423714883.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या