🌟परभणी तालुक्यातील रोजी मौजे नांदगाव बुद्रुक येथे शेतकरी मार्गदर्शक बैठक संपन्न....!


🌟सदर बैठकीस कृषि पर्यवेक्षक रजनिकांत देशमुख यांनी उगवण क्षमता बीज प्रक्रिया बाबत प्रात्यक्षिक करून दाखवले🌟

परभणी : परभणी तालुक्यातील रोजी मौजे नांदगाव बुद्रुक येथे दि.25 में 2024 रोजी कृषि विभागाच्या वतीने येणारा खरीप हंगाम समोर ठेवून नियोजन बाबत माहिती दिली प्रशांत ढोके. सदर बैठकीस कृषि पर्यवेक्षक रजनिकांत देशमुख यांनी उगवण क्षमता बीज प्रक्रिया बाबत प्रात्यक्षिक करून दाखवले, निविष्ठा खरेदी करताना घ्यावयाची काळजी, महा dbt योजना बदल तुषार ठिबक यांत्रिकीकरण बदल माहिती दिली  तर कृषि सहाय्यक प्रशांत ढोके यांनी MREGS फळबाग भाऊसाहेब फुंडकर फळबाग गट शेती,बिबिफ लागवड तंत्रज्ञान,शेततळे, पिक स्पर्धा बाबत मार्गदर्शन आर यू देशमुख यांनी केले 

निविष्ठा खरेदीवेळी जागरूक राहा असे आव्हाहन केले ते म्हणतात शेतीमध्ये बियाणे, खते, कीडनाशके आदी निविष्ठांचा वापर अत्यंत महत्त्वाचा ठरतो. बऱ्याच वेळा निविष्ठा खरेदीवेळी फसवणूक होण्याची शक्यता असते. त्यामुळे या निविष्ठांच्या खरेदी करताना अत्यंत दक्ष राहणे आवश्‍यक आहे.

बियाणे खरेदीवेळी विक्रेत्याकडून पक्के बिल घ्यावे. बिलावर दुकानाचे नाव, खरेदीदाराचे नाव, उत्पादकाचे नाव, बियाण्याचे नाव, लॉट क्रमांक, विक्रीची किंमत असल्याची खात्री करावी. पावतीवर विक्रेत्याची व शेतकऱ्याची सही व अंगठा असावा कच्चे बील स्वीकारू नये. पक्क्या बिलासाठी आग्रह करावा मिळालेले बील जपून ठेवावे.

पिशवीच्या लेबलवरील माहिती पाहावी. या लेबलवर पिकाचे नाव व त्यात पिकाची उगवणशक्ती, भौतिक व आनुवंशिक शुद्धता टक्केवारी, बियाणे चाचणीची तारीख, महिना व वर्ष, वजन, बीज प्रक्रियेसाठी वापरलेले रसायन, किंमत इत्यादी गोष्टींचा उल्लेख तपासावा.बियाणे पिशवीवर असलेला किंमतीपेक्षा जास्त भावात बियाणे खरेदी करू नये पेरणीसाठी पिशवी फोडताना ती खालील बाजूने फोडावी. त्यामुळे पिशवीस असलेले लेबल व बीज प्रमाणीकरण यंत्रणेचा टॅग व्यवस्थित राहील. लेबल, टॅग जपून ठेवावा.

मुदतबाह्य झालेले तसेच पॅकिंग फोडलेले सुटे बियाणे खरेदी करू नये. एमआरपीपेक्षा जादा दराने खते, बियाणे व कीटकनाशके खरेदी करू नयेत. कीटकनाशके अंतिम मुदतीच्या आतील असल्याची खात्री करावी.कीटकनाशके अंतिम मुदतीच्या आतील असल्याची खात्री करावी. काही तक्रार असेल तर कृषि विभागाकडे  तक्रार करावी असे आव्हान कृषि पर्यवेक्षक यांनी केले आहे

सर्व शेतकरी बांधवांनी उगवण क्षमता तपासून बीज प्रक्रिया करूनच योग्य खोलीवर योग्य ओलाव्यात पेरणी करण्याबाबत ठरवले आहे यावेळी नांदगाव बुद्रुक गाव चे सरपंच गंगाधर (नाना )जवंजाळ, जवंजाळ पोलीस पाटील शेतकरी बांधव उपस्थित होते.......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या