🌟वाशिम शहराचे ग्रामदैवत असलेल्या बालाजी मंदिरात आज शुक्रवार दि.१८ मे रोजी व्यंकटेश पद्मावती विवाह सोहळा....!


🌟वाशिम येथील नरसिंह मंदिराचे दार नरसिंह जयंतीनिमित्त २२ मे २०२४ रोजी उघडणार🌟 


फुलचंद भगत

वाशिम - वाशिम शहराचे ग्रामदैवत असलेल्या बालाजी मंदिरात आज शुक्रवार दि.१८ मे २०२४ रोजी सायंकाळी ०६.०० वाजता व्यंकटेश पद्मावती विवाह सोहळा मोठ्या उत्साहात पार पडणार असून या व्यंकटेश पद्मावती विवाह सोहळ्यासाठी बालाजी भक्त आणि वाशिमकरांमध्ये अत्यंत उत्साह व आनंदाचे वातावरण आहे. सर्वजण दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी व्यंकटेश पद्मावती विवाह सोहळा साजरा करण्यासाठी सज्ज झाले आहेत.

* वाशिम येथील नरसिंह मंदिराचे दार नरसिंह जयंतीनिमित्त २२ मे २०२४ रोजी उघडणार :-

वाशिमच्या ग्रामदैवत बालाजी मंदिरामध्ये असलेले नरसिंह मंदिर नरसिंह जयंतीच्या अनुषंगाने २२ मे ला उघडणार आहे. दरवर्षी फक्त नरसिंह जयंतीच्याच दिवशी उघडणार्‍या मंदिराच्या दर्शनाचा लाभ भाविक भक्तांना सकाळी ६ ते रात्री १० वाजेपर्यत घेता येणार आहे. सकाळी ६ ते रात्री १० वाजेपर्यत घेता येणार्‍या या दोन्ही कार्यक्रमाला जिल्हावासीयांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन बालाजी संस्थानचे वहिवाटदार विश्वस्त अ‍ॅडव्होकेट भवानीपंत काळू व समस्त विश्वस्तांनी केले आहे.......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या