🌟परभणीत पारदेश्वर फार्मर प्रोडूसर कंपनीच्या भाजीपाला शॉपीचे उद्घाटन संपन्न....!


🌟मराठवाडा कृषी विद्यापीठाचे डॉ. कुलगुरू डॉ.इंद्र मणी यांच्याहस्ते उद्घाटन संपन्न🌟 


परभणी (दि.०९ मे २०२४) - परभणी येथील जिंतूर रोडवरील शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे कमानी शेजारी आज अक्षय तृतीयाचा मुहूर्तावर पारदेश्वर फार्मर प्रोडूसर कंपनीच्या भाजीपाला शॉपीचे उद्घाटन सोहळा मोठया उत्साहात पार पडला. मराठवाडा कृषी विद्यापीठाचे डॉ. कुलगुरू डॉ. इंद्र मणी यांच्याहस्ते उद्घाटन झाले. 


याप्रसंगी अप्पर जिल्हाधिकारी डॉ. प्रताप काळे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. नागेश लखमवार, उपमुख्य कार्यकारी अधिकारी ओम प्रकाश यादव, उपविभागीय अधिकारी दत्तू शेवाळे, ज्येष्ठ विधिज्ञ अशोक सोनी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रवी हरणे, डॉ. प्रशांत भोसले,  प्रगतशील शेतकरी पंडित थोरात, आमदार राहुल पाटील यांच्या सौभाग्यवती समप्रिया राहुल पाटील चंद्रपूरचे डेप्युटी कलेक्टर संजय पवार एसबीआय चे प्रबंधक अलम मोहम्मद मकसूद आर्यन पाटील जिल्हा प्रबंधक अनिल गवळी, नित्यानंद काळे आदी मान्यवरांची उपस्थिती होती. 

यावेळी कुलगुरू डॉ. इंद्र मणी यांनी शेतकर्‍यांच्या या उपक्रमाचे  कौतुक करून शेतकर्‍यांना प्रोत्साहन दिले. तसेच यावेळी येत्या वर्षभरात कलेक्टर ऑफिस जवळ भाजीपाला उत्पादक ग्रुपसाठी एक आउटलेट करून देणार आहे, असे अपर जिल्हाधिकारी प्रताप काळे सांगीतले. अन्य मान्यवरांनीही समयोचित मार्गदर्शन केले. 

भाजीपाला शॉपीमधील सुविधा 

या शॉपीमुळे दररोज ताजा भाजीपाला, फळे, सेंद्रिय धान्य, दाळी सर्व प्रकारचे दुग्धजन्य पदार्थ लोणचे, मसाले, वेगवेगळ्या प्रकारच्या चटण्या, लाकडी तेल घाण्याचे तेल, आत्मा अंतर्गत तयार तयार केलेल्या महिला बचत गटांनी सर्व प्रकारच्या पापड्या, पापड, कुरडई, खारवडी इत्यादी अन्नपदार्थ हे सर्व आपल्याला एका छताखाली आणि घरपोच सुद्धा मिळेल या संकल्पनेचे विशेष म्हणजे व्हाट्सअपच्या माध्यमातून एक दिवस अगोदर ऑर्डर घेतल्या जातील आणि सकाळी या सर्व ऑर्डर प्रमाणे घरपोच भाजीपाला-फळे व सर्व पदार्थ पाठविले जातील. जे व्हाट्सअपद्वारे ऑर्डर देऊ शकत नाहीत अशा लोकांसाठी दिवसभर शॉपी उघडी राहील. त्या लोकांनी सर्व प्रोडक्टचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांतर्पेâ करण्यात आले. 

या शॉपीचा मोबाईल क्र. (७०२८७०१७१२) आहे. कृष्णा गणगे, रामेश्वर साबळे या नंबरवर व्हाट्सअप किंवा फोन करून आपण ऑर्डर देऊ शकता. येथे एका छताखाली आपल्याला सर्वकाही उपलब्ध होईल. ही संकल्पना जनार्दन आवरगंड माखणी, प्रकाश हरकळ, रामेश्वर साबळे, विजय जंगले, गोविंदराव बोचरे, राजेंद्र ढोकर, वैâलास साबळे, त्रिंबक कणगे, जनार्धन रणेर, श्याम रेंगे अशा भाजीपाला ग्रुपच्या सर्व सदस्यांच्या संकल्पनेतून साकारली आहे. प्रस्ताविक व सूत्रसंचालन आत्माच्या सहाय्यक तंत्रज्ञान व्यवस्थापक स्वाती घोडके यांनी केले. आभार रामेश्वर साबळे यांनी केले.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या