🌟जागतिक कासव दिन : ओ ब्रदर्स, आइ लव्ह टर्टल्स.....!


🌟कासवाशी संबंधित १० मनोरंजक आणि रोचक तथ्ये🌟 

कासव आणि ससा यांची कथा तुम्ही ऐकली असेलच. या कथेत कासव विजेता आणि ससा हरणारा आहे. वास्तविक कासव हे आपल्या परिसंस्थेसाठी खूप महत्वाचे आहे. या कारणास्तव दरवर्षी २३ मे रोजी जागतिक कासव दिन साजरा केला जातो. दिवसाची सुरुवात अमेरिकन कासव रेस्क्यूने केली होती. या दिवसाशी संबंधित सर्व महत्वाची माहिती श्री कृष्णकुमार आनंदी-गोविंदा निकोडे गुरूजींच्या सदर संकलित लेखातून जाणून घेऊया... संपादक._

    कासवाशी संबंधित १० मनोरंजक आणि रोचक तथ्ये अशी आहेत- १. कासवे वाळूमध्ये खड्डे खणून आपली घरटी बनवतात, ज्यामध्ये एका घरट्यात सुमारे १००-१२५ अंडी असतात. त्यांच्या अंड्यांच्या गटाला क्लच म्हणतात. २. कासवाचे लिंग वाळूच्या तापमानावर अवलंबून असते. जर तापमान कमी असेल तर ते पुरुष मूल आहे आणि जर तापमान उबदार असेल तर ते मादी मूल आहे. ३. इतर कासवांच्या तुलनेत, समुद्री कासवे त्यांच्या कवचाच्या आत जाऊ शकत नाहीत. ४. डायनासोरच्या काळापासून म्हणजे सुमारे २०० दशलक्ष वर्षांपासून कासवाची प्रजाती अस्तित्वात आहे. ५. कासवाचे कवच हा त्याचा सांगाडा असतो, ज्यामध्ये ५० हाडे असतात. बरगड्याचा पिंजरा आणि पाठीचा कणाही या सांगाड्यात असतो. ६. जमीनीवरचे कासव बीटल, फळे आणि गवत खातात. समुद्री कासव सीव्हीड आणि जेलीफिश खातात. ७. जगात कासवांच्या सुमारे ३५६ प्रजाती आहेत. ८. कासवे खूप रडतात. कासवाच्या डोळ्यातून पाणी येते ते दुःखी आहे म्हणून नाही तर समुद्राच्या पाण्यात जास्त मीठ असल्याने त्याच्या डोळ्यातून अश्रू येतात. ९. अनेक देशांमध्ये फक्त कासव पाहिल्यामुळे भरपूर पर्यटन येते. १०. समुद्री कासवे पाण्यात दीर्घकाळ राहतात आणि समुद्राच्या आतच झोपतात. कासवाची अंडी वाटोळी असतात. त्याचे कवच टणक असते. सागरी कासव एकाचवेळी पाच अथवा अधिक अंडी घालू शकते. जमिनीवर राहणाऱ्या कासवाची पिल्ले ४५ ते ५५ दिवसात म्हणजे सर्वसाधारणपणे दोन-तीन महिन्यात मातीतून वर येऊ लागतात. त्यावेळी आजूबाजूची वाळूमय जमीन थोडी हलू लागते. कासवाचे आयुष्य शंभर ते एकशे पन्नास वर्ष असते. भारतात कासवांपासून ढाली तयार केल्या जातात. 

         ऑलिव्हर रिडले या कासवाच्या दुर्मीळ प्रजातीचे मच्छिमारांच्या जाळ्यात अडकून होणारे मृत्यू रोखण्यासाठी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजिकल मेट्रॉलॉजी- आयआयटीएम मधील शास्त्रज्ञांनी बंगालच्या उपसागरातील त्यांची आयुष्यरेषा शोधली आहे. इंग्लंड येथून निघणाऱ्या मॉरिने डिओसीसी या जागतिक नियतकालिकात ही संशोधनपर माहिती प्रसिध्द झालेली आहे. कासव हा वन्यप्राणी असून त्याला घरात जिवंत ठेवणे, बंदिस्त करणे हा गुन्हा आहे़ वन्यसंरक्षण कायदा १९७२ अन्वये कलम ९ नुसार संबंधितांवर कारवाई होऊ शकते. नागरिकांनी समोर येऊन तक्रार करणे महत्त्वाचे आहे़. सुखसमृध्दीसाठी कासव घरात फीशपॉटमध्ये ठेवणे कायद्याने गुन्हा आहे़.

           जागतिक कासव दिनाचा इतिहास काय आहे? तर या दिवसाची सुरुवात दि.२३ मे २००० रोजी अमेरिकन कासव रेस्क्यू या ना-नफा संस्थेने केली होती. कॅलिफोर्नियातील मालिबू शहरात राहणाऱ्या सुसान टेलम यांनी या दिवसाला जागतिक कासव दिन असे नाव दिले. सुसान टेलम यांना मार्शल थॉम्पसन, अमेरिकन कासव बचावचे संस्थापक यांनी दुजोरा दिला. हा दिवस अनेक देशांमध्ये साजरा केला जातो. सन २०२३ची थीम आय लव्ह टर्टल अशी ठेवण्यात आली आहे. या थीमचे महत्त्व असे आहे की, कासव २५-१०० वर्षे जगतात ज्यामध्ये त्यांना अनेक दुःख आणि आनंद दिसतात. बर्‍याचदा लोकांना कुत्रा किंवा मांजर जास्त आवडते पण कासवाचे व्यक्तिमत्वही असेच असते. कासव ही अशी एक प्रजाती आहे जी या पृथ्वीवर २०० दशलक्ष वर्षांहून अधिक काळ जगत आहे, परंतु आता ही प्रजाती हळूहळू नष्ट होत आहे. 

!! विश्व कासव दिनाच्या सर्वांना सजगतेसंबंधी हार्दिक हार्दिक शुभेच्छा !!

 

     

                    - संकलन व सुलेखन -

                    श्री कृष्णकुमार आनंदी-गोविंदा निकोडे गुरूजी.

                     एकता चौक, रामनगर वॉर्ड, गडचिरोली.

                      फक्त दूरभाष- 7775041086.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या