🌟जंग-ए-अजित न्युज - महत्वाच्या अपडेट / हेडलाईन्स / बातम्या.....!


🌟अहमदाबाद विमानतळावर आयएसआयएस च्या 4 दहशतवाद्यांना बेड्या : घातपाताचा कट उधळला चौघेही श्रीलंकन🌟

 ✍️ मोहन चौकेकर

* मुंबईत अनेक ठिकाणी मतदानाचं ढिसाळ नियोजन..गोरेगाव, दहिसर,मुलुंड भागात मतदारांची ओढाताण,आयोगाच्या नियोजनावर मतदार संतप्त

* निवडणूक आयोगाकडून जाणीवपूर्वक मतदानासाठी विलंब, उद्धव ठाकरेंचा गंभीर आरोप...पराभवाच्या भीतीने मोदी सरकार पछाडल्याची उद्धव ठाकरेंची टीका...तर उद्धव ठाकरे यांचे पराभवाच्या भितीने रडगाणं सुरू, देवेंद्र फडणीवासांचा हल्लाबोल 

* पहाटेचे चार वाजले तरी मतदान झाल्याशिवाय मतदारांनी मतदान केंद्र सो़डू नये, उद्धव ठाकरेंचं आवाहन...तर संथगतीनं मतदानाची तक्रार आम्हीच आधी केली होती, देवेंद्र फडणवीसांचा टोला...

* महाराष्ट्रात संध्याकाळी ५ वाजेपर्यंत ४८.६६ टक्के मतदान, दिंडोरीत सर्वाधिक ४५.९५ टक्के,तर सर्वात कमी कल्याणमध्ये ४१.७०  टक्के मतदान

* पवईच्या हिरानंदानी भागात दोन तासांच्या गोंधळानंतर मतदान पुन्हा सुरु, ठाकरे गटाच्या आदेश बांदेकरांचा संताप, शिंदे गटाचे आमदार दिलीप लांडेंना थेट आत सोडल्याने तीव्र नाराजी

* ईव्हीएम कक्षाला हार घातल्याने शांतिगिरींंवर आचारसंहिताभंगाचा गुन्हा दाखल...त्र्यंबकेश्वरमध्ये केंद्रप्रमुखांना न जुमानता मतदान कक्षावर गळ्यातला हार घातल्याचा आरोप बीग बी अमिताभ बच्चन, रेखा ,

* सलमान खान, शाहरुख खान, सचिन तेंडुलकर, अमिर खान,  रणवीर, दीपिका, हृतिक रोशन, शिल्पा शेट्टीचं मतदान...तर दोन तास रांगेत उभं रहावं लागल्याने अभिनेत्री भाग्यश्रीचा संताप...

* पुण्यातील हिट अँड रन प्रकरणी कठोर कारवाई करा,गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पुणे पोलीस आयुक्तांना आदेश..तर भरधाव वेगात कार चालवतानाचा नवा सीसीटीव्ही समोर

* बारावीच्या विद्यार्थ्यांची धाकधूक वाढली, बोर्डाचा निकाल उद्या जाहीर होणार, दुपारी एक वाजता वेबसाईटवर निकाल पाहता येणार 

* राज्यात अनेक ठिकाणी मान्सूनपूर्व पावसाची हजेरी.. जालन्यात अनके ठिकाणी जोरदार वाऱ्यासह मुसळधार पाऊस तर तळकोकणातही मान्सूनपूर्व पावसाच्या सरी

* कल्याणमध्ये 80 हजाराहून अधिक तर भिवंडीत लाखाहून अधिक नावं गायब, निवडणूक आयोगाचा सावळा गोंधळ समोर

* अहमदाबाद विमानतळावर ISIS च्या 4 दहशतवाद्यांना बेड्या, घातपाताचा कट उधळला, चौघेही श्रीलंकन

* उत्तरप्रदेशात एका रात्रीत शेतकरी झाला अब्जाधीश, खात्यावर आले तब्बल 99 अब्ज 99 कोटी 94 लाख रुपये

* भारताच्या लेकीनं इतिहास रचला; दीप्ती जीवनजीने पॅरा ॲथलेटिक्समध्ये तिरंगा फडकवला

* कार्तिक आर्यनच्या ‘चंदू चॅम्पियन’मध्ये झळकणार मराठमोळी अभिनेत्री हेमांगी कवी; 14 जूनला सिनेमागृहात चित्रपट होणार रिलीज 

* राज्यात वादळवाऱ्यासह अवकाळी पाऊस, शेतकऱ्यांवर आर्थिक संकट , पिकांचे भाजीपाला व फळबागांचे प्रचंड नुकसान.

✍️ मोहन चौकेकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या